शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसई-नायगावमध्ये युरोपातील पाहुण्या फ्लेमिंगोंचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:28 IST

सिमेंटच्या जंगलामुळे साजेसे वातावरण नाही; आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे झाले कमी

विरार : दरवर्षी प्रमाणे यंदाही वसई नायगाव परिसरात फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मात्र, या वर्षी त्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. वसई मधील सनसिटी, गोगटे सोल्ट, उमेळमान, राजिवली आणि नायगाव येथे फ्लेमिंगो या पक्षांचे वास्तव्य तीन महिने असते. तर पक्षी प्रेमींनी त्यांचे हे मोहक रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी केलली पहावयास मिळत आहे. वसई सनसिटी भागत तर पक्षीप्रेमींची छायाचित्रे काढण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गर्दी होत आहे.दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यावर हे परदेशी पक्षी येत असतात. चमचेकरकोचे, उघड चोच करकोचे, राखाडी बगळे, वारकरी बदक आणि अजूनही खूप वेगवेगळे पक्षी येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांची मोठी गर्दी असते.फ्लेमिंगो या पक्षाला रोहित किंवा हंस हे पारंपारीक नाव आहे. हा पाहुणा दरवर्षी युरोपहून वसई नायगाव मध्ये पाहुणचारासाठी येत असतो. याचे मूळ वास्तव्य हे युरोप मधील सायबेरियात आहे. पावसाळ्यात हे पक्षी इतर ठिकाणी जात असतात. यंदा त्यांनी वसईत मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येत आहे.या पक्षांचे आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने या पक्षांचे आगमन देखील लवकर झाल्याचे दिसून येत आहे.फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान पाण्याच्या अनुकूल परिस्थितीनुसार ते कच्छ मध्ये असतात, नंतर सप्टेंबर ते आॅगस्ट दरम्यान वसईत आगमन करतात. वसईच्या मिठागरांत फ्लेमिंगो ची राखाडी कलर ची पिल्ले दिसून येत आहेत. हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्याने त्यांच्या हालचालीचे टप्पे टिपण्यासाठी पक्षी अभ्यासकांनी येथे बस्तान बांधले आहे.फ्लेमिंगोंच्या संख्येत घटफ्लेमिंगो हे पक्षी पाणथळ जागेत जास्त दिसतात. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी पाणथळ जागेत माती टाकून तिथे भराव करून, बिल्डर इमारतीच जंगल तयार करत आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षांची संख्या देखील कमी होत चालली आहे. त्यांना हवे असलेले अनुकूल वातावरण व त्यांचे आवडते खाद्य पदार्थ त्यांना आधी वसई - विरार भागत मुबलक प्रमाणत मिळत होते. मात्र, आता ते कमी झाले आहेत. माणसांनची चाहूल लागली की, ते अजून दूर जातात. या सर्व परिस्थितीमुळे त्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. असे पक्षी प्रेमी सचिन मेन यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार