शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या दोन बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी विकले, १२ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:51 IST

विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे.

नालासोपारा : विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरच्यांसह १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघींच्या माहेरुन १० लाख रूपये वसूल करूनही सासरच्या लोकांची हाव भागली नाही. शेवटी त्यांनी सख्ख्या जावा झालेल्या या दोन्ही बहिणींना सासरच्या मंडळींनी अनन्वीत अत्याचार करून विकून टाकले होते. सहप्रवाशाने मदत केल्याने हा कट उघडकीस आला.विरार येथील संजय व वरूण रावळ या दोन भावांचा दोन सख्ख्या बहिणींसोबत २०१५ साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर रावळ कुटुंबीयांनी हुंड्यासाठी या दोघींवर अनन्वीत अत्याचार सुरू केले. माहेरच्यांकडून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात येत होता. तीन वर्षे हा अत्याचार या दोघी मुकाट सहन करीत होत्या. या दरम्यान दहा लाखांहून अधिक रक्कम सासरच्यांनी उकळली होती. मात्र त्यांची पैशाची हाव कमी होत नव्हती. आणखी चार लाखांची मागणी ते करू लागल्यावर या दोघींनी आता पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्यामुळे सासरची मंडळी चिडली होती. हे चार लाख मिळविण्यासाठी सासरच्यांनी या दोघींना राजस्थानमधील विरवडा येथे नेऊन जाळून मारण्याची धमकीही दिली. तरी पैसे मिळत नाही. हे पाहताच त्यांनी या दोघींची एका व्यक्तीला दिड लाखात विक्र ी केली होती.३० आॅगस्ट रोजी सासरची मंडळी या दोन्ही सुनांना घेऊन आपल्या राजस्थानातील मूळ गावी गेले होते. ९ सप्टेंबरपर्यंत जनापूर येथे राहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीसोबत त्यांना मुंबईला पाठविण्यात आले. मात्र वसई रोड स्थानक आल्यावर या दोघींना या व्यक्तीने उतरूवून देतांना, तुम्हाला सासरच्यांनी दिड लाखात मला विकल्याचे सांगितल्यामुळे त्यांना धक्का बसला.सुदैवाने त्याच डब्यातून प्रवास करणा-या एका गुजराती कुटुंबानी त्यांची सुटका करत त्यांना वसईरोडला उतरण्यास मदत केली.>या महिलांच्या तक्रारींवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ४९८ (अ) कलम लावण्यात आला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या कोणालाही अटक केली नाही. - विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक, वसई