शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम; २०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:16 IST

२०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन, १ अर्ध आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन तर २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहसी विक्रम नोंद

मंगेश कराळे

नालासोपारा: विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याने आता आपल्या नावावर आणखी काही नव्या विक्रमांची नोंद केलेली आहे. यापूर्वी अनेक अर्ध व पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा तसेच अल्ट्रामॅन, वर्ल्ड मेजर मॅरेथॉन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिक पाटील यांनी यशस्वीरित्या सफल केल्या आहेत. त्यांच्या विक्रमी नोंदींमध्ये आणखी काही महत्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेंची व त्या स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडलेली आहे.

हार्दिक पाटील यांनी नुकताच फेब्रुवारी २०२४ मध्येच 'फ्लोरिडा २०२४अल्ट्रामॅन' हि स्पर्धा सलग तीन दिवसांत अमेरिकेतील 'फ्लोरिडा' याठिकाणी सातासमुद्रापार परदेशात पुर्ण करत देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जग पातळीवर उंचावले होते आणि भारताचा झेंडा अटकेपार फडकवला होता; त्यानंतर आता एका वर्षभरातच १० फुल आयर्नमॅन स्पर्धा जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, ॲस्टोनिया, स्वीडन, जपान, स्पेन, अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये जाऊन तर भारतातील गोवा येथे १ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत.

त्याच बरोबरीने जपान आणि जर्मनी ह्या देशांमध्ये ह्याचवर्षी 'वर्ल्ड मेजर मॅरेथॉन' स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमसुध्दा हार्दिक पाटलांनी केलेला आहे. शिवाय जगभरात झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धा ३५ वेळा पूर्ण करणारा दुसरा भारतीय तर हाफ आयर्नमॅन स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारा प्रथम भारतीय ह्या साहसी विक्रमांची नोंद देखील हार्दिक पाटील यांनी आपल्या नावे जमा केली आहे. हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. यापूर्वीदेखील अनेक साहसी, विक्रमी नोंदी त्यांच्या नावे आहेत.

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. १७ तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात. ही स्पर्धा आर्थिक दृष्ट्या महाग असल्याने सर्वसामान्य खेळाडूला या स्पर्धेचं चॅलेंज स्वीकारणे आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही, परंतु 'मी लवकरच भारतासह पालघर जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना यात सामाहून घेत, स्पर्धेकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे', अशी माहितीही त्यांनी दिली. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार