शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Virar: विरारमध्ये घरातील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:10 IST

Virar Slab Collapses News: विरारमध्ये राहत्या घराचा स्लॅब कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विरार पश्चिम येथील एका अपार्टमेंटमध्ये घराचा स्लॅब कोसळून एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

अल्फिया अब्बास मानसवाला असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अल्फिया आपल्या कुटुंबासह एमबी इस्टेट परिसरातील मर्चंट अपार्टमेंटमध्ये सी-विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११ मध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी अल्फिया तिच्या पतीसह हॉलमध्ये झोपले होती. तर, तिचा मुलगा, सून आणि नातवंड बेडरूममध्ये झोपले होते. दुपारी अचानक हॉलचा स्लॅब कोसळला. या घटनेत अल्फिया गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब विरारमधील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राम कुंडगीर यांनी दिली. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :VirarविरारMaharashtraमहाराष्ट्र