शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विरार, नालासोपारामध्ये सक्तीने घडवून आणला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:43 IST

विरार, नालासोपारा मध्ये मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

विरार : बुधवारच्या मराठा बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. विरार, नालासोपारा मध्ये मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मराठा समाजाने रस्त्यावर उतरून जी दुकाने चालू होती ती देखील बंद करणे भाग पाडले. नालासोपाऱ्यातील आचोळे रोड, तुळींज रोड येथे कार्यकर्त्यांनी ‘रस्ता रोको’ केला. ब्रीजच्या मध्यभागी थांबून त्यांनी दोन्ही बाजूने येणारी वाहने अडवीली. शाळा, कॉलेज व मेडिकल स्टोअर्स व रुग्णालये वगळता सारे काही बंद करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. या रस्ता रोकोतून रुग्णवाहिका व शाळेच्या बसेस वगळण्याचा आदेश आंदोलनाच्या समन्वयकांनी दिला होता. सकाळी तो पाळला गेला परंतु दुपारी मात्र त्यांनाही बंद पाळणे भाग पाडले गेले. एसटी, रिक्षा व परिवहन बसेस देखील बंद केल्याने रेल्वेस्टेशन ला पोहचण्यासाठी चालत जाण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नव्हता. कोणताही स्थानिक नेता किंवा आमदाराला आम्ही येथे आसपास फिरकू देणार नाही, आणि जर असा कुणी दिसला तर त्यांना आम्ही चोप देऊ असा इशारा आंदोलकांनी दिला होता. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही अधिक आक्रमक होऊ असे एका महिला आंदोलकाने लोकमतशी बोलताना सांगितले. रिक्षा चालकांना देखील रिक्षा बंद ठेवा अन्यथा आम्हाला तोडफोड करावी लागेल असा इशारा दिल्याने रिक्षाही बंद होत्या. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVirarविरारmarathaमराठा