शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल

By admin | Updated: April 11, 2017 02:06 IST

वाहतूक पोलीस दरमहा किमान पन्नास लाखाचा हप्ता वसुल करीत असल्याची बातमी लोकमतने सविस्तरपणे प्रसिद्ध केली होती. वालीव येथील एक वाहतूक पोलीस चक्क

- शशी करपे,  वसईवाहतूक पोलीस दरमहा किमान पन्नास लाखाचा हप्ता वसुल करीत असल्याची बातमी लोकमतने सविस्तरपणे प्रसिद्ध केली होती. वालीव येथील एक वाहतूक पोलीस चक्क एका राजकीय नेत्याकडे हप्त्याची मागणी करीत असल्याचे संभाषण व्हायरल झाल्याने या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तसेच बेकायदा वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक पोलीस करीत असलेली लुटमार चव्हाट्यावर आली आहे.वसई पूर्वेकडील वालीव, सातीवली, भोयदापाडा आदी औद्योगिक क्षेत्रात पदाचा गैरवापर करून वाहतूक पोलीस नारायण चौगुले हप्तेखोरी करीत असल्याचाआरोप वडार समाजाचे नेते आणि बहुजन विकास आघाडीच्या विमुक्त भटका समाज आघाडीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी केला आहे. नारायण चौघुले आणि वामन शेळके यांच्या हप्त्यासाठी झालेल्या संभाषणाची ध्वनीफित (ही ध्वनीफित लोकमतच्याही हाती लागली आहे) शेळके यांनी व्हायरल केली आहे. या संवादात चौगुले असंसदीय शब्दप्रयोग करून चक्क शेळके यांच्याकड हप्त्याची मागणी करीत असल्याचे ऐकू येते. धक्कादायक बाब म्हणजे शेळके पाचशे रुपये पाठवतो असे सांगत असताना चौगुले मात्र हजार रुपये आणि दरमहा हप्ता द्यायला सांगा असेही सुनावत असताना ऐकू येते. दोन महिन्यांपूर्वीच वाहतूक पोलीस बेकायदा रिक्शा, मॅजिक रिक्शा, सहा आसनी रिक्शा, टेम्पो, स्कूल बस, खाजगी बस, पाण्याचे टँकर, रेतीचे ट्रक यांच्यासह विविध वाहन चालकांकडून महिन्याला तब्बल पन्नास लाखांहून अधिक हप्ता गोळा करीत असल्याची यादीही दिली होती. शेळके यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनाही हजार रुपयांसाठी वाहतूक पोलीस कशा पद्धतीने अडवणूक करीत असतात हे उजेडात आल्यानंतर त्यांच्या हप्तेबाजीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याऐवजी आडमार्गावर उभे राहून मोटार सायकली आणि माल वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे वसई विरार परिसरात पहावयास मिळते. रिक्शाचालक हप्ते देत असल्याने त्यांना मोकळीक असते. ‘आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात’वालीव भागातील एका चारचाकी गाडी चालकावर चौगुले यांनी कारवाई केली होती. याप्रकरणात चालकासाठी शेळके यांनी चौगुलेंना मोबाईलवरू न संपर्क साधला होता. यावेळी हप्त्याचे एक हजार रुपये थकीत असल्याचे सांगत आपल्याला नियमित पैसे दिल जात नसल्याने कारवाई केल्याचेही चौगुले अगदी निर्लज्जपणे शेळके यांना सांगत असताना ऐकू येते. इतकेच नाही तर आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे या छोट्याशी गोष्टीत आपण लक्ष घालू नका, असा सल्लाही चौगुले देत असल्याचे ऐकू येते.