शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खाडीपुलाच्या मार्गाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:01 PM

बाधित होण्याची भीती? : भाईंदर - नायगाव खाडी पुलाचा उताराचा मार्ग बदला

आशिष राणेवसई : नायगाव ते भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत जोडणाऱ्या भाईंदर-नायगाव खाडी पुलाच्या प्रस्तावित मार्गाला नायगाव कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यात नायगाव कोळीवाडा येथे राहणाºया स्थानिक मच्छीमार नागरिकांच्या मच्छी सुकविण्याच्या व इतर सार्वजनिक वापराच्या जागेतून हा खाडी पूल जाणार असल्याने गावांतील मच्छीमार यामुळे बाधित होणार आहेत. यामुळेच हा विरोध असून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी शनिवारी आयोजित एका सभेत चर्चा करण्यात आली.भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिश कालीन पूल वापरासाठी देण्याची तेथील नागरिकांची जुनी मागणी होती. परंतु हा जुना खाडी पूल कमकुवत असल्याने त्याला पूर्वीच केंद्र सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र याला पर्याय म्हणून भाईंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी मागणी समोर आली. हा पूल तयार झाला तर वसई-विरारकर हे भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाण्यासाठी लागणारा एक ते दीड तास वाचणार आहे. या पुलासाठी निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा लवकरच मागविण्यात येईल.

सर्व्हे क्र. १२ मधून जातोय उतार ; त्यालाच होतोय विरोध?या पुलाचा उतार हा नायगाव येथील मच्छीमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर प्रस्तावित असल्याने स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. मुख्य म्हणजे स्थानिकांना विश्वासात न घेता हा उतार येथे देण्यात येणार असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. ज्यावेळी सर्वेक्षणासाठी या भागात अधिकारी आले त्यावेळी ही पुलाच्या उताराची बाब समोर आल्याचे ही गावकºयांनी सांगितले. त्यानंतर तात्काळ येथील कोळी बांधवांनी स्थानिक स्तरावर सभा घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाºयांना स्थानिकां सोबत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शनिवारी सभा संपन्न झाली.

या सभेत स्थानिकांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. नायगाव या भागात सर्वे क्र मांक १२ ही मच्छीमार समाजासाठी सार्वजनिक वापराची जागा आहे. ही जागा नायगाव येथील मच्छीमार संस्थेच्या नावे आहे. या हक्काच्या जागेत मच्छीमार बांधवांच्या मार्फत मासळी सुकविणे, जाळ्याचे विणकाम करणे, बोटीची दुरु स्ती करणे व खेळण्यासाठी मैदान म्हणून या जागेचा वापर होतो. परंतु या जागेतून भार्इंदर नायगाव खाडीपूल जाणार असल्याने आता अन्य नागरिकांसाठी जरी हा मार्ग सोयीचा असला तरी येथील स्थानिक मच्छीमार बांधव यामध्ये बºयापैकी भरडला जाणार आहे, असेही संतप्त गावकºयांनी सांगितले,

पावसाळ्यात मासेमारी बंदी कालावधीमध्ये हे मच्छीमार सुक्या मासळीची विक्री मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे ही मासळी सुकविण्याचे काम मार्च ते मे दरम्यान होत असते. यासाठी हे मच्छीमार या जागेचा वापर करतात. तर, दुसरीकडे मच्छीमार येथे बोटीही ठेवतात. जर या जागेतून हा खाडी पूल गेला तर मच्छीमारांचे मोठे नुकसान होईल, असा दावाच गावकºयांनी केला आहे.