- शशी करपे, वसई
बेकायदा लॉजेस परिसरात अनैतिक धंदे सुरु असून पोलिसांकडे तक्रार करूनही काही कारवाई होत नाही. म्हणूनच राजोडी आणि कळंब गावकऱ्यांनीच अश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी जोडप्यांना इशारा देणारे फलक राजोडीत लावले आहेत. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवरील अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरात अनेक बेकायदा रिसॉर्ट सुरु आहेत. कळंब परिसरात तर सरकारी जागेवर अतिक्रमण करून असे रिसॉर्ट सुरु असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. आता तर काही रिसॉर्ट मालकांनी थेट समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण करून छोट्या झोपड्या बांधून त्या प्रेमीयुगुलांना •भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. त्यात अनैतिक धंदे चालत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. अल्पवयीन शालेय विद्यार्थींनीसह दिवस•भर कॉलेज युवती आणि महिला जोडीदारांसह येत असतात. काही जोडपी तर रस्त्याच्या कडेला, समुद्रकिनाऱ्यावर अश्लिल चाळे करीत असतात. येथील रिसॉर्टमध्ये प्रेमी युुगुलांना तासभरासाठी दोनशे-तीनशे रुपये दराने खोल्या दिल्या जातात. त्याठिकाणी गैरधंदे होत असतात. जोडपी मोटार सायकली आणि रिक्शाने ये-जा करीत असतात. नाक्यावरील पोलीस त्यांना अडवून त्यांच्याकडून ५० रुपये वसूल करून पुढे पाठवून देतात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडू लागले आहे, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. या जोडप्यांवर वचक निर्माण करण्यासाठी राजोडी गावकऱ्यांना नामी श्नकल लढवली आहे. अश्लिल चाळे करणारी जोडपी आढळली की गावातील लोक पकडून त्यांना चोपतात. रिक्षांमधून अथवा मोटार सायकलवरून अल्पवयीन मुली आलेल्या दिसल्या की त्यांना अडवून परत पाठवले जाते. या जोडप्यांना इशारा देण्यासाठी नाक्यावर चक्कफलकही लावण्यात आले आहेत. युनायटेड क्लब आॅफ राजोडी आणि ग्रामस्थांनी हेफलक लावले.