शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडला भुरट्यांंची दहशत, पोलिसांना येत आहे अपयश, गस्त वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:26 IST

विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड षहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली

राहुल वाडेकर विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड शहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली असून यामध्ये जास्त लहान मुलांचा (१२ ते १५ वर्षाच्या) समावेश आहे़. ही मुले महिलांवर वॉच ठेवतात व त्यांनी काहीही खरेदीकरीता आपली पर्स बाहेर काढली की त्यांच्यावर अ‍ॅटॅक करुन पर्स पळवून नेतात. मुले लहान असल्याने ती पटकन नाहीशी होतात़ गेल्या दोन दिवसांपूर्वी विक्रमगड शहराचा बुधवारी आठवडी बाजारात पाच महिलांच्या पर्स अशा रितीने चोरण्यात आलेल्या आहेत व असेच प्रकार वाढीस लागलेले आहेत. याबाबत एपीआय विश्वास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की अजून दोन पोलिसांची गस्त वाढवून या भुरटया चोरांवर लक्ष ठेवले जाईल़दरम्यान यापूर्वी देखील विक्रमगड शहर परिसरात वारंवार मोबाइलची दुकाने फोडून तसेच घरफोडी करण्याचे प्रकार वाढलेले होते. या टोळीला पकडण्यात अजून पोलिसांना यश आलेले नाही.एक वर्षापूर्वी चो-यांचे अधिक होते त्यामुळे शहराच्या चारही कोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढविली होती मात्र कालांतराने गस्त कमी झाल्याने चोºयांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तसेच अलिकडे जरीमरीनगर परिसरसत घरफोडया करुन चोरटयांनी चांदी सोने, रोख रक्कम अशी मिळून जवळ जवळ २ लाख १८ हजाराचा एैवज लंपास केला आहे.तसेच यतीन घरत, रघुनाथ दुपारी व जनार्दन पाथरवट यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या कानाकोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहेगतवर्षी देखील याच पहील्याच आठवडयात एकाच रात्रीमध्ये याच जरीमरी नगर परिसरात जवळजवळ सहा ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या. चोरी करणारे इसम प्रथम परिसराची टेहळणी करुन माहिती काढून त्याप्रमाणे रात्रीे ज्या घरास कुलूप आहे़त्या घरात चोरी करायची व आजूबाजूला असलेल्या घरांच्या कड्या बाहेरुन लावून घ्यायचे. यावेळी मात्र यतीन घरत हे चोर घरामध्ये असतांनाच लग्नाहून परत आले होते परंतु त्याचे बरोबर घरातील महिला असल्याने त्यांना काहीच करता आले नाही मात्र चोरांनी घरत यांचा गाडीचा आवज ऐकल्याने पळ काढला मात्र चोरांना पळतांना त्यांनी पाहीले परंतु ते त्यांना ओळखू शकले नाही़>गस्त वाढवासद्यस्थितीत विक्रमगडमध्ये पोलिसांची गस्त वाढली पाहीजे कारण मोबाइल दुकाने फोडणे, घरफोड्या, सायकल, पेट्रोल, मोटरसायकल यांच्या चोºया वाढल्या आहेत़ यामधील आरोपी पोलिसांच्या हाती अदयापही लागलेले नाही़. यामुळे आता पोलिस व नागरिकांनी सतर्क राहून चोरटयांना जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक जनतेकडून होते आहे़>विक्रमगड शहराच्या बुधवारी आठवडी बाजारात लहान मुलांकडून भुरटया चो-या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एखादी महिला वस्तू खरेदी करीतांना पर्स हातामध्ये ठेवताच ती लंपास करण्याचे प्रकार होत आहे़ त्यामुळे महिलांनी देखील पोलिसांच्या भरवशावर न राहता सतर्क राहून चोरटयांना धडा शिकविला पाहिजे. आता आपल्यालाच खंबीर होण्याची गरज आहे़-अनिता पाथरवट, जरीमरी नगर विक्रमगडनागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिस ठाण्याला माहिती देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर आपल्या घराची दारे-खिडक्या काळजीपूर्वक बंद करणे, सिक्युरिटी नेमतांना त्याची संपूर्ण पार्श्वभूमी, माहित करून घ्या, भाडेकरु ठेवतांना माहितीतलाच ठेवा. याबाबतची नोंद तरी पोलिस ठाण्यात करा. पोलिसांबरोबरच जनतेनेही जागरूक व सतर्क राहीले पाहिजे़ बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तू, दाग-दागिने घरात ठेवू नये़ तसेच बाजारामध्ये फिरतांना आजूबाजूला लक्ष ठेवावे. पर्समधील पैसे काढतांना सतर्क राहावे़- विश्वास पाटील, एपीआय, विक्रमगड