शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विक्रमगडचे रजिस्टर कार्यालय बनले दारू पिण्याचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:06 IST

प्रभारी उपनिबंधकाचा धिंगाणा

पालघर : विक्रमगडच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक संतोष घाणेकर हे कार्यालयातच दारू पिऊन पडून राहत असल्याची गंभीर घटना मागच्या आठवड्यात घडली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यालयात नेहमीच मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने निलंबनाच्या कारवाईची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यात नागरीकरणाला वेग आला असून अनेक तालुक्यांत रहिवासी संकुले उभी राहत आहेत. या संकुलातील फ्लॅट, दुकानाचे गाळे, विक्री करार, पॉवर ऑफ ॲटर्नी, लीज डीड, गिफ्ट डीड आदींची नोंद करण्यासाठी तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालये उभारण्यात आली आहेत. विक्रमगड तालुक्यात विक्रमगड-डहाणू रस्त्यावरील एका इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवशी नोंदणी केली जाते. या कार्यालयातील वरिष्ठ क्लार्क घाणेकर यांच्याकडे प्रभारी उपनिबंधकाचा पदभार सोपविल्याची माहिती जिल्हा निबंधक एन.व्ही. पिंपळे यांनी ‘लोकमत’ला दिली. या कार्यालयात नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी असून कार्यालयीन वेळेत प्रभारी उपनिबंधक घाणेकर हे दारू पिऊन वावरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

मागच्या आठवड्यात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रभारी उपनिबंधक घाणेकर हे दारू पिऊन कार्यालयात पडून राहिल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.  त्यांना हाताला पकडून काही लोकांनी एका रिक्षात बसवून विक्रमगडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यापूर्वीही दारू पिऊन आल्यानंतर  त्यांना उपचारासाठी विक्रमगडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील  अनेक महिन्यांपासून असे प्रकार सर्रास घडत असूनही दारूबाज उपनिबंधकाविरोधात कुठलीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशा मद्यपी अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.- सुनील भुसारा, आमदारअशा कुठल्याही तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नसून अशी काही गंभीर घटना घडली असल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.- एन.व्ही. पिंपळे, जिल्हा निबंधक, पालघर 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारliquor banदारूबंदी