विक्रमगड : सकाळच्या वेळी गार हवा पडावी, धुके दाटावे आणि अंथरुणातुन उठावेसेच वाटु नये, असे दिवस सध्या येऊ लागले आहेत. गुलाबी थंडीची चाहुल लागल्याने पहाटे उठाणाºया मंडळींनीही सकाळी-सकाळी पांघरुण ओढुन थंडी अनुभवायला सुरुवात केली आहे, गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच विक्रमगडमध्ये थंडीचे आगमन झाले असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत.तालुक्यात थंडीमुळे हुडहुडी भरत असल्याने बाजारात स्वेटर व ब्लॅकेट्सची मागणी वाढली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. तर अनेकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहेत. सायंकाळनंतर रस्त्यावर स्वेटर परिधान केलेले अनेक जण दिसत असल्याने शहरात हिवाळ्याचा माहोल तयार झाला आहे.दिवसभर देखील हवेत गारवा जाणवतो आहे़ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासुन थ्ांडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ़थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरु होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत़ रात्री आठ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत़ तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी सहा वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत़ बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत आहे.
विक्रमगडकरांना थंडीची हुडहुडी भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:28 IST