शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

नवरात्रीसाठी वसईकर सज्ज

By admin | Updated: September 30, 2016 03:04 IST

नवरात्रीसाठी वसईत जोरदार तयारी सुुरु झाली आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. तर आजपासून मोठ्या मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मूर्तीच्या

- शशी करपे,  वसईनवरात्रीसाठी वसईत जोरदार तयारी सुुरु झाली आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. तर आजपासून मोठ्या मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मूर्तीच्या किंमतींमध्ये सुमारे २० टक्यांनी वाढ झाली आहे. गरब्यासाठी मंडळांची लगबग सुरु आहे. जीवदानी मंदिरात नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाची जोरदार तयारी सुुरु असून यंदाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर पोलिसांनीही वसई विरार परिसरात कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याासठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.वसईत नऊ दिवस गरब्यांची धूम असते. नवघर-माणिकपूर शहरात गुजराती परिवाराचा साई नगर मैदानात होणारा पारंपारिक पद्धतीने होणारा गरबा वसईतील मुख्य आकर्षण असते. यंदाही विविध कलाकारांच्या उपस्थितीत गुजराती परिवाराचा गरबा महोत्सव होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मंडळाचे बिपीन खोखाणी यांनी दिली.विरार येथील जीवदानी देवी मंदिरात नऊ दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमायेच आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर दररोज नियमितपणे महाअभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार, नैवेद्य, धूपारती, आरती, हवन पूजा, नवग्रह, गणेश पूजन, कलश पुण्यहवन केले जाते. तर नऊ दिवस दैनंदिन पूजा विधीसह दररोज पहाटे साडेपाच, दुपारी बारा आणि सायंकाळी साडेसात वाजता आरती केली जाणार आहे.गडावर नऊ दिवस मोफत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त पंकज ठाकूर यांनी दिली.मंदिरात दररोज किमान पन्नास हजारांहून अधिक भाविक हजेरी लावतात. तर शेवटच्या दिवशी दोन लाखांहून अधिक भाविक गर्दी करतात. म्हणून सुरक्षेसाठी विविध शंभर जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मंदिर व्यवस्थापनाने स्वत:चे ८० सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. त्याचबरोबर विवा कॉलेजचे एनसीसीचे तीनशे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून हजर राहणार आहेत. मेटर डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.पोलीस यंत्रणा सज्जनवरात्रौत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धक्का न लागता सुरळीतपणे पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांनी मंडळांना वेळेत आणि आवाजात मर्यादा ठेऊनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यंदाही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवासाठी २४ पोलीस अधिकारी, २०१ पोलीस कर्मचारी, १३५ होमगार्ड यांच्यासह तीन एसआरपी प्लाटून आणि दोन आरसीपीच्या तुकय्ऋ्या तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ३ डिएफएमडी, ५ एचएचएमडी आणि १५ वॉकीटॉकी टीम शहरात कार्यरत असणार आहेत. तसेच नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात येणार आहे.यंदाही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे.