शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वसईकरांना वैद्यकीय सेवा मिळणार विनामूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:28 IST

वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वच वैद्यकीय सेवा नवीन वर्षात आता विनामूल्य दिल्या जाणार आहेत.

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वच वैद्यकीय सेवा नवीन वर्षात आता विनामूल्य दिल्या जाणार आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या औषधापासून शस्त्रक्रियेचा खर्च महानगरपालिकेतर्फे उचलला जाणार आहे. माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी याबाबत सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा महापालिकेकडून विनामूल्य उपलब्ध व्हावी म्हणून पाठपुरावा केला होता.सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आस्थापना वगळता ३६ कोटी रु पयांची वार्षिक तरतूद आहे, तर आरोग्य विभागासाठी २० कोटी रु पये खर्च होत असतो. बाह्यÞ रु ग्णांकडून महापालिकेला दोन कोटी रु पयांचे उत्पन्न मिळते. आरोग्य सेवा मोफत केल्याने महानगरपालिकेवर तीन पटीने आर्थिक भार पडणार आहे.महापालिकेकडे २१ आरोग्य केंद्रे असून त्यात वाढ केली जाणार आहे. १५ आरोग्य केंद्रे वाढवली जाणार आहे. १०० खांटांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. पालिकेकडे सध्या जूचंद्र (नायगाव), सातिवली (वसई) आणि सर्वोदय नगर (नालासोपारा) येथे तीन माता बालसंगोपन केंद्रे असून त्यात महिलांची विनामूल्य प्रसूती केली जाते. विरारच्या नारिंगी आणि नाळा येथे आणखी दोन माता बालसंगोपन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.याबाबत प्रविणा ठाकूर यांनी सांगितले की, महापौर पदावर असताना वैद्यकीय सहाय्यतेसाठी अनेक लोक मदतीसाठी येत होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा घेण्यास ज्या लोकांनी आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विनामूल्य उपचारकरता येईल का असा विचार समोर आला होता. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. माता बाल संगोपन केंद्र सद्या वसईत तीन आहेत. त्यांची संख्या आणखीन दोनने वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन गरज असल्यास त्याचा विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.वसई विरार महानगरपालिकेकडे सध्या दोन रुग्णालये, तीन माता बालसंगोपन केंद्रे व २१ आरोग्य केंद्रे आहेत. या रु ग्णालयात दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी तसेच उपचारांसाठी दाखल होत असतात. त्यांच्या विविध तपासण्या, शस्त्रक्रीया केल्या जातात. महानगरपालिकेकडून काही औषधांचा पुरवठाही केला जातो, तर काही औषधे बाहेरून आणण्यासाठी लिहून दिली जातात. मात्र, अनेक रुग्णांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतरही औषधांचा भार सहन करावा लागतो, तसेच वारंवार रुग्णालयात यावे लागते. या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना तर औषधांसाठी वारंवार यावे लागते. अनेकांना डायलिसीस करून घ्यावे लागते. तात्कालीन महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या लक्षात या बाबी आल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवा मोफत कशी करता येईल यासाठी पालिका प्रशासनापुढे पाठपुरावा केला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका आता दंकचिकित्सेपासून अनेक शस्त्रक्रीया आणि चाचण्या मोफत करणार आहे. एकदा रु ग्ण उपचारासाठी दाखल झाला की त्याचा सर्व खर्च पालिका करणार आहे, तसेच नंतरही त्याला लागणारा सर्व उपचार मोफत केला जाणार आहे.गरीब ,गरजू लोक पैशाअभावी वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.पालिकेच्या या निर्णयाचे निश्चितच सर्व स्तरातून स्वागत होईल.- प्रविणा हितेंद्र ठाकूर,माजी महापौरवैद्यकीय सेवेसाठी एखादा रु ग्ण आल्यास त्याचा संपूर्ण खर्च पालिकेकडून विनामूल्य केला जाणार आहे. मोफत उपचार, औषधे व उत्तम दर्जाची आरोग्य सेवा महानगरपालिका पुरवणार आहे.- सतीश लोखंडे, आयुक्त,वसई-विरार महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार