शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:38 IST

वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान ही तर मागील वर्षी ची पुनरावृत्ती म्हणत यावेळी सुध्दा वसईकर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे वसई संपूर्ण जलमय झाली आहे, यामध्ये वसई बस आगाराचे तळे झाले असून वसंत नगरी, पार्वती क्र ॉस,अंबाडी रोड,आनंदनगर ,माणकिपूर, चुळणे सनिसटी गास गावसाहित विरार, नालासोपारा अणि वसई पूर्वेस सर्वत्र पाणी साचल्याने रहिवासी व औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले आहेत. त्यातच कुठे पडझड तर वसई- विरार मध्ये या चार दिवसांत एकूण 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका, पोलीस व महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत एकूण ९१७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे तहसील विभागाने सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे वसई-विरार मधील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अनेक इमारतीच्या आवारामध्ये पाणी साचले आहे. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी विजे अभावी सलग चार दिवस टप्प्याटप्प्याने वसाहत बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार दुसºया टप्प्यातील कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी तर राज्य सरकारने शाळा ,कॉलेज आणि शासकीय निमशासकीय आदींना सार्वजनिक सुट्टी च जाहीर केली त्यामुळे बर्यापैकी जनता बाहेर दिसली नाही. पालघर,ठाणे जिल्ह्यातून वसईत या ठिकाणी चाकरमानी ये-जा करत असतात. सोमवारी -मंगळवारी सकाळी वालीव, गोखिवरे, सातिवली येथे पावसाचे पाणी साचल्याने तुरळक खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. मात्र रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने चारही बाजूला पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला वसई पूर्व स्थानक परिसर सार्वजनिक वाहनांची बºयाच वेळ प्रतीक्षा करत पावसात उभे राहावे लागले. त्यामुळे रांगच्या रांग लागली असल्याचे दिसून आले. वसई स्थानक परिसरातील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. याच पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागली. बाहेरून आलेल्या प्रवाशांची यावेळी अक्षरश: ससेहोलपट झाली.विरार मधील विवा कॉलेज मध्ये ही पाणी घुसले !सतत कोसळणाºया पावसामुळे विरार चे विवा कॉलेज व उड्डाणपुलाजवळ ही मोठया प्रमाणात पाणी साचले असल्याचे चित्र स्पष्ट होते,यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना गैरसोय निर्माण झाली. बोळींज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दरवर्षी पाणी साचते. यंदाही या शाळेसमोर पाणी साचल्याने दिसून आले. विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भुवन या ठिकाणीदेखील पाणी रस्त्यावर साचले आहे. तर, दुसरीकडे वसई-विरार पालिका हद्दीत चार दिवसांत एकूण २० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे अिग्नशमन विभागाचे अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार