शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

अनैतिक धंद्यांना वसईत पोलिसांचेच संरक्षण

By admin | Updated: February 10, 2017 03:57 IST

वसईत अंमली पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवहार तेजीत आहे. त्याचबरोबर वेश्याव्यवसायही फोफावला असून त्यात तरुण पिढी गुरफटल्याची खळबळजनक माहिती

शशी करपे ,वसईवसईत अंमली पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवहार तेजीत आहे. त्याचबरोबर वेश्याव्यवसायही फोफावला असून त्यात तरुण पिढी गुरफटल्याची खळबळजनक माहिती देतानाच वरिष्ठ आपणाला याप्रकरणात कारवाई करु देत नाहीत, असा आरोप वसईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठांना पाठवलेल्या गोपनीय पत्रात केला आहे. (त्या पत्राची प्रत दैनिक लोकमतच्या हाती लागली आहे). याप्रकरणी पुराव्यानिशी माहिती देऊ, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वरिष्ठांविरोधात बंडाचा झेंडा उगारल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. वसईच्या अनैनितक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी वसईचे अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांना पाठवलेल्या पत्रात वसईतील वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थ खरेदी-विक्रीची माहिती देऊन आपले वरिष्ठ या धंद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. वसई विरार शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरले असून त्यात शाळकरी आणि महाविद्यालयीन तरूण तरूणी गुरफटल्याचा आरोप गोसावी यांनी आपल्या पत्रात केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसईतील एका पोलीसाचे कुटुंब अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन बरबाद झाल्याची माहिती गोसावी यांनी उजेडात आणली आहे. आपण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेत आल्यापासून खबऱ्यांचे जाळे तयार केले आहे. त्यांच्या माध्यमातून वसई विरार परिसरातील अनैतिक व्यवसायाची इत्थंभूत माहिती गोळा केली आहे. ती वरिष्ठांना अनेकवेळा दिली आहे. पण, वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असून आपणालाही काम करू देत नाहीत. शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती पाटील काहीच काम करीत नसल्याचा धक्कादायक आरोपही गोसावी यांनी या पत्रात केला आहे. या शाखेतील कुणाशीही माझा वैयक्तिक वाद नाही. फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून माहिती देण्यासाठी मी हे पत्र पाठवित आहे, असे गोसावी यांनी म्हटले असून यामुळे दुखावलेले भ्रष्ट अधिकारी आपली प्रतिमा मलीन करून अडचणीत आणतील अशी भीतीही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. आपणाकडे वसई विरार परिसरात सुुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाची पुराव्यासह माहिती असून कारवाई करणार असाल तर ती देऊ असा दावा गोसावी यांनी आपल्या पत्रात केला आहे. गोसावी यांनी आता थेट अगदी वरिष्ठांनाच आव्हान दिल्याने काय कारवाई केली जाते हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.