पारोळ : गेल्या आठवड्यापासून नाताळच्या उत्साही दिवसात थंडीमुळे वसईतील तापमान घसरल्याने वसईतील पश्चिम व पूर्व भागात थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच हवेत गारवा वाढत असल्याने वसईकरांचा वर्षाचा शेवट उबदार कपडे घालूनच होणार आहे.वसई तालुक्यात पश्चिम व पूर्व भाग निसर्गसंपदा असल्यामुळे या भागातील तापमान १३ अंशापर्यंत कमालीचे घसरले. रात्रीच्या वेळी वसई ग्रामीण भागातील थंडीमुळे वाहतुकीचा वेग ही मंदावला असल्याचे दिसत आहे. थंडीचा सामना करताना नागरीकांची तारांबळ उडत आहे. संध्याकाळी प्रत्येकजण थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपड्याचा आधार घेताना दिसत आहेत. चौकाचौकामध्ये शेकोटीचेही दर्शन होत आहे. थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला, घशाला खवखव अशा आजाराच्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. या भागातील थंडीमुळे हॉटेल, चहा टपऱ्यांना सुगीचे दिवस, कडाक्याच्या थंडीमुळे आले आहेत.ही थंडी श्रीमंतांनाही गुलाबी वाटत असली तरी वसई तालुक्यामध्ये शेकडो विटभट्टीवरील कुटूंब झोपडीत उघड्यावर राहत असल्याने त्यांच्यासाठी ही थंडी असहाय्य अशी ठरत आहे. (वार्ताहर)
वसईत तापमान घसरले
By admin | Updated: December 29, 2015 00:07 IST