शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वसईत उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना

By admin | Updated: May 28, 2017 02:58 IST

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची

- लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी अ़नैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार महेश गोसावी, सुनीता कांटेला, शारदा गोर्डे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, प्रशांत देसाई, अर्चना कोळी यांची एक टीम तयार केली. तिने बोगस गिऱ्हाईक पाठवून सापळा रचला.यावेळी एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांनी या बोगस गिऱ्हाईकांसमोर तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलीला आणले. त्यानंतर पथकाने धाड टाकली. यावेळी पोलिसांनी तीनही आरोपी महिलांना अटक केली. तसेच तीन पिडीत महिला आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली.या तीन आरोपी पिडित महिला आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी तीन महिलांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.दरम्यान, माणिकपूर शहरात याआधी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना आनंद नगर येथील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून कुंटणखाना चालवत असलेल्या एक महिलेसह पुरुषाला अटक केली होती. यावेळी चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली होती. तर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई रोड रेल्वे परिसर आणि नवघर एसटी स्टँड परिसरात अनेक वेश्या खुलेआम फिरून गिऱ्हाईके शोधून शहरातील लॉजेसमध्ये अनैतिक व्यवसाय करीत आहेत. याप्रकरणी आनंद नगर परिसरातील शंभरहून अधिक सोसायट्यांनी तक्रार केली आहे. तसेच महिलांनी आंदोलन करून पोलिसांचे याकडे लक्षही वेधले आहे. त्यानंतरही खुलेआम फिरणाऱ्या वारांगणांवर कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येतो.