शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

बेकायदा हाेर्डिंगमुळे वसई-विरार विद्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:27 IST

महापालिका जाहिरात धाेरणाची ऐशीतैशी : प्रशासनाचे हाेतेय दुर्लक्ष

आशीष राणेलाेकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या डोळ्यांदेखत शहरातील नऊ प्रभाग समितींच्या विविध भागांत बेकायदा होर्डिंग व फलकांचा अक्षरश: विळखा पडला आहे. या बेकायदा हाेर्डिंगकडे महापालिका प्रशासनाची डाेळेझाक हाेत असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. बेकायदा जाहिरातबाजी करणारे या प्रकाराला जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार पालिका आणि अधिकारीही आहेत. मुळात शहरात महापालिकेच्या विविध उपक्रमांच्या जाहिरांतींबाबत खुद्द पालिकेकडूनही शिस्त पाळली जात नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पालिकाच नियम माेडत असल्यामुळे बेकायदा जाहिरात करणाऱ्यांना माेकळे रान मिळत आहे. त्यामुळे या हाेर्डिंग, फलकांच्या विळख्यात शहराचा जीव गुदमरत असल्याचे दिसत आहे.  २०१७-२०१८ मध्ये वसई-विरार पालिकेने घेतलेला नव्या-जुन्या फलक बंदीचा निर्णय खुद्द महानगरपालिका प्रशासनच धाब्यावर बसवत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. झाडे, विजेचे खांब, विद्युत डीपीवर जाहिरातबाजी केली जात आ असल्याचे निदर्शनास आले आहे. 

प्रशासनाच्या डुलक्या n एकीकडे व्यावसायिक आणि पालिकेने स्वतः उभारलेली होर्डिंग वगळता इतर कोणत्याही ठिकाणी होर्डिंग-फलक-बॅनर लावण्यास मनाई केली आहे.  n सर्वेक्षण झाले नसल्यामुळे हाेर्डिंग, बॅनरची खरी आकडेवारी उपलब्ध नाही. शहरात बेकायदा होर्डिंगची संख्या एक ते दाेन हजारांच्या आसपास आहे.  n जाहिरात विभागाला २०१९-२०२० मध्ये ३९ लाखांचे उत्पन्न मिळाले हाेते, तर मधल्या तीन ते चार वर्षे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील जाहिरात वसुलीच केली नव्हती, असे समजते.

पालिकेने धोरण न ठरविताच मुंबईच्या एका जाहिरात कंपनीला कवडीमोल भावाने ठेका दिला हाेता. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. करारानुसार महापालिकेने दहा वर्षांसाठी हा ठेका बहाल केला हाेता. त्यापाेटी पालिकेला दाेन काेटींचा महसूल देणे अपेक्षित हाेते. आता शहरात पालिका अतिक्रमण विभागाकडून ताेडक कारवाई सुरू आहे.

पालिका आयुक्तांनी उपन्न-वाढीसाठी जाहिरात धोरणानुसार नवीन दर वाढवून दिले. सर्वेक्षण करून बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी प्रभाग समिती स्तरावर अतिक्रमण विभागांस आदेश दिले आहेत. त्यानुसार नोटीस देऊन कारवाई सुरू आहे.  - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

पालिका आयुक्तांनी उपन्न-वाढीसाठी जाहिरात धोरणानुसार नवीन दर वाढवून दिले. सर्वेक्षण करून बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी प्रभाग समिती स्तरावर अतिक्रमण विभागांस आदेश दिले आहेत. त्यानुसार नोटीस देऊन कारवाई सुरू आहे.  - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

महापालिकेने जाहिरात धोरण आणले असले तरी एकाच कंपनीला ठेका दिला जाताे, हे चुकीचे आहे. ग्रामपंचायत व नगरपालिका असल्यापासून आम्ही व्यवसाय करीत आहाेत. पालिकेनेही कायदेशीर होर्डिंग ठेवून विद्रुपीकरण थांबण्यासाठी कठाेर पावले उचलणे आवश्यक आहे, असे एका समाजसेवकाने सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार