शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:52 AM

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- वसंत भोईरवाडा -  शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र वनक्षेत्रपाल हेही त्यास तेवढेच जबाबदार असतानाही त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठांची चालढकल सुरू आहे. या कारवाईबाबत वन विभागाच्या दक्षता पथकानेच आक्षेप नोंदवून कारवाईच्या सूचना केल्या असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाडा मनोर या महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकूडसाठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली. या धाडीत लाकडाचा साठा जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून २० जुलै २०१८ पासून कारवाई करण्यास सुरु वात केली. या कारवाईला विलंब झाल्याने सापळे यांच्याबाबत संशय व्यक्त केला असून विभागीय दक्षता पथकाचे विभागीय अधिकारी संतोष सस्ते यांनी जव्हारच्या उपवनसंरक्षकांना ३० जुलै रोजी पत्र काढून वनक्षेत्रपालाविरोधात आक्षेप नोंदवले आहे व कारवाई करण्याची सुचना केली आहे.वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना ११ जुलै रोजी डेपोची तपासणी करून अनियमितता असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही कारवाई २० जुलै रोजी केली आहे. प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल यांनी तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित होते. पंरतु गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आक्षेप पत्रात नोंदवला आहे. स्थळ पंचनाम्यानुसार वन उपजाचे मोजमाप केले असता जागेवर जवळपास १०१५ घनमीटर इतका अवैध वनउपजाचा साठा आढळून आला आहे. हा दास्तान डेपो वनपरिक्षेत्र अधिकारी वाडा यांचे कार्यालयापासून काही अंतरावर आहे.डेपोवरील आवक जावक रजिस्टरची तपासणी केली असता एकदाही वनक्षेत्रपाल यांनी तपासणी केल्याची नोंद नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वनोपजाची वाहतूक होऊन डेपोवर साठा होत असताना वनक्षेत्रपाल यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. यावरून कर्तव्यात टाळाटाळ केल्याचे सिध्द होत असल्याचा आक्षेप पत्रात नोंदवण्यात आला आहे.लाकडे कोणत्या जंगल अथवा मालकी क्षेत्रातील हे गुढच'वनगुन्हा दाखल होऊनही विनापरवाना माल कोणत्या जंगलातून अथवा मालकीतून आला याची चौकशी झालेली नसून ठोस कारवाई करण्याबाबत वनक्षेत्रपाल टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी संतोष सस्ते यांनी उपवनसंरक्षक जव्हार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. वनक्षेत्रपाल यांचेवर वनसंरक्षणात्मक कामात हलगर्जीपणा केल्याचा आक्षेप पत्रात नोंदवले आहेत.दरम्यान, वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही कारवाईच संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्या बाहेरील वनअधिकाºयाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात यावा अशी मागणीही वक्षप्रेमी करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या