शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचा संप सुरूच, आजचा सहावा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:26 IST

वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु होते.वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बंदचा आजचा ...

वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु होते.वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बंदचा आजचा सहावा दिवस असून मध्यंतरी दोनवेळा संप मागेही घेण्यात आला होता. पण, दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्यावरून वाद झाल्याने हा संप सुरु राहिला आहे.बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्त सतीश लोखंडे यांनी संपकरी श्रमजीवी कामगार संघटनेचे नेते विवेक पंडित यांना दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांनाही त्याचा पुनरूच्चार केला होता. पण, गुरुवारी रात्री परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी बडतर्फ कामगारांना चौकशी केल्यानंतर कामगार घेऊ अशी भूमिका घेतली. त्यावरून पुन्हा वाद सुरु झाला. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून कामगार पुन्हा संपावर गेले आहेत.शुक्रवारी संपकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी आयुक्त आणि ठेकेदाराशी चर्चा केली. पण, आयुक्तांनी हात वर करीत ठेकेदारच निर्णय घेईल असे सांगून कामगार बडतर्फीबाबत घुमजाव केले. तर ठेकेदार सकपाळ यांनी चौकशी झाल्यावरच कामगारांना कामावर घेऊ अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी कोणताच तोडगा न निघाल्याने काम बंद सुरुच राहिले आहे. ठेकेदार आणि कामगार यांच्या या वादात प्रवाशांचे मात्र हाल होत आहे.संपाशिवाय पर्यायच नाहीआयुक्त सतीश लोखंडे यांनी सर्व मागण्या मान्य करतांना बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. आता त्यांनीच शब्द फिरवल्याने संपाशिवाय पर्याय नाही, असे विवेक पंडित यांनी सांगितले.