शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेचे उद्दिष्ट ३०० कोटींच्या करवसुलीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:33 IST

वसई- विरार महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात एकूण २३ कोटी ५६ लाख इतकी करवसुली केली.

वसई : वसई- विरार महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात एकूण २३ कोटी ५६ लाख इतकी कर वसूली केली असून आतापर्यंत मालमत्ता कराची १०० कोटीची वसूली करण्यात आली आहे. तसेच ३०० कोटी रु पयांचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध प्रकारे थकबाकीदारांना आवाहन करण्यात येत आहे.करवसूली करतानाच मालमत्ता जप्ती यासह नळजोडणी खंडित करण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या मालमत्ता कर विभागाने दिला आहे. तिने चालू व थकबाकी करवसुलीवर भर दिला आहे, यासाठी रिक्षाचा वापर , विविध ठिकाणी मालमत्ता कर भरण्याविषयीचे फलक, देयके अदा करण्याची घोषणा करीत आहेत. करवसुलीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कराची वसुली व्हावी म्हणून ठेका पद्धतीने ११० कर्मचारी घेण्यात आले आहेत. वालीव, वसई, नालासोपारा, विरार, आचोळे, चंदनसार, नवघर- माणिकपूर, पेल्हार, बोळींज या नऊ प्रभागात मोहीम राबविली जात आहे. रहिवासी आणि औदयोगिक वसाहतीत हे कर्मचारी जात असून कर भरण्याचे आवाहन, देयके, नोटीस देण्याचे काम तसेच, वसूली करीत आहेत. मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांची यादी काढून त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. शंभर टक्के मालमत्ताधारकांना देयके अदा करण्यात आली आहेत.अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे हे रोज नऊ प्रभागातील सहाय्यक आयुक्तांकडून वसुलीचा अहवाल घेत आहेत. सर्व प्रभागात पर्यवेक्षक नेमलेले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत नागरीकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा केला नाही तर अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असून प्रसंगी नळजोडणी बंद करण्यात येणार असल्याचा इशारा दिला जात आहे.ठिकठिकाणी ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी जास्त आहे त्यांच्या नावानिशी फलक लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर वसई विरार महापालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांनो होशियार, मालमत्ता कर लवकर भरा अन्यथा जप्ती आणली जाईल हो... अशी दवंडी मराठी व हिंदी भाषेतून केली जात आहे. गेल्यावर्षी अशीच दवंडी घोड्यावर बसून केली गेली होती. मागणीची देयके शंभर टक्के दिली असली तरी पुन्हा स्मरणपत्र देखील देण्यात येणार आहे.वसुलीवर भर दिल्याने नोव्हेंबर महिन्यात २३ कोटी ८६ लाख वसुली झाली आहे.।यंदा मार्चपर्यंत ३०० कोटी वसुलीवर भर दिला आहे. यासाठी कर्मचारी घरोघरी, औदयोगिक वसाहत व व्यापाऱ्यांना देयके देणे व वसुली करणे असे काम करत आहेत. कार्यलयात येणे शक्य नसेल तर आॅनलाईन करभरणा करावा. थकबाकीदारांची वसुली करण्यासाठी नळजोडणी व मालमत्तेची जप्ती आणली जाईल. करदात्यांनी सहकार्य करावे.- विश्वनाथ तळेकर, सहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर संकलन विभाग