शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:40 IST

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत.

विरार/नालासोपारा : वसई-विरार शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असून येथील लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला असून याचा अचूक फायदा घेत टँकर व्यावसायिकांनी वसई-विरारमध्ये आपले बस्तान घट्ट बसविले आहे. पाणी विक्रीतून या लाॅबीला लाखो रुपयांचा नफा होत असताना महापालिकेला मात्र कराचे पैसेही मिळत नसल्याने मोठा फटका बसत असल्याचे उघड झाले आहे.टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. या व्यवहारातून वार्षिक अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून येथील टँकरमालक बिनदिक्कतपणे पाण्याची लूट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. तरीही आजपर्यंत पालिकेकडून यांच्यावर कोणतीही कर आकारणी केली गेलेली नाही.वसई-विरार महापालिका हद्दीतील नैसर्गिक पाण्याचे हे बाजारीकरण जोरात सुरू असून या व्यावसायिकांवर पाालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम १३० अंतर्गत टँकर व्यावसायिकांना तसेच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना पाणी लाभ कर आकारला जावा, अशी मागणी केली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने  अनधिकृतरीत्या पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारून टँकर व्यावसायिकांसह बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या पाणी लाभ श्रेणीत आणून महापालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

१२०० रुपयांची गुंतवणूक, २४ हजारांचा नफा!बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तर सगळ्याच सीमा पार करून २० लीटरचा पाण्याचा बाटला सरासरी ४० रुपयांना विकण्यास सुरुवात केली आहे. १२०० रुपयांना मिळणाऱ्या १२ हजार लीटर पाण्याच्या एका टँकरचे पाणी शुद्धीकरण करून पिण्यास योग्य असल्याचा बनाव करून त्यातून तयार होणारे सहाशे बाटलीबंद डबे विकून हे पाणी विक्रेते सरासरी २४ हजार रुपयांचा भरघोस नफा एका टँकरमागे प्रतिदिन कमवत आहेत. या व्यवहारातून दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी