शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 10:09 IST

ओमायक्रॉनचा धसका : इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा धाकधूक

नालासोपारा : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराचा धसका सरकारी यंत्रणांनी घेतला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्बंध लादण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेची जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेली निवडणूक किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने  सरकारी यंत्रणांनी आढावा घेणे सुरू केले आहे.मुंबईसह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीदेखील सुरू केली आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होणार असल्यामुळे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकांनी आराखडा तयार करण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. दहा वर्षांच्या काळात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन, सरकारने पालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या वाढत्या संख्येनुसार वॉर्डांची रचना करण्याचे कामदेखील केले जात आहे. ही कामे सुरू असतानाच आता ओमायक्रॉन  नावाचा कोरोना संसर्गाचा नवीन प्रकार पुढे आला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो, असेही निरीक्षण नोंदविले जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी ओमायक्रॉनचा धसका घेतला आहे. आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या या नव्या प्रकारचा प्रसार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत. निर्बंधही कडक करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिकेची निवडणूकही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवीन बाधितांची भर वसई-विरार महानगरपालिका हद्दीत पुन्हा कोरोना रुग्ण आढळू लागले असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांमध्येही बेफिकिरी दिसून येत आहे. सध्या मनपा हद्दीत १८५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे मनपाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी कळविले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूकOmicron Variantओमायक्रॉन