शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वसई-विरारमध्ये घरोघरी ३ हजार १८५ माघी बाप्पांचे होणार आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:36 IST

आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाची धूम आता मराठी माघ महिन्यातही जल्लोषात साजरी होऊ लागली आहे.

पारोळ : आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाची धूम आता मराठी माघ महिन्यातही जल्लोषात साजरी होऊ लागली आहे. ठिकठिकाणी बाप्पांच्या उत्सवाचा जल्लोष वर्षातून दोनदा साजरा होत असल्याने बाहेरगावी कामाधंद्यासाठी स्थायिक झालेल्या नागरिकांची पावले आपसूकच आपल्या गावाकडे वळू लागतात. या आठवड्यात शुक्र वारी (दि.८) माघी गणेशोत्सव सुरू होत आहे. या तालुक्यात यंदा ३ हजार १८५ बाप्पांचे आगमन होणार असून यात ४३ सार्वजनिक तर ३ हजार १४२ घरगुती बाप्पा आहेत.तालुक्यात बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून गणेश कला मंदिरांतदेखील बाप्पांच्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी, गुरु वारी गर्दी केली. वसई-विरार उपप्रदेशाची लाकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बाहेरगावाहून कामाधंद्यानिमीत्त याठिकाणी स्थायिक झालेले नागरिक धार्मिक श्रद्धेपोटी आॅगस्ट आणि मराठी माघ महिन्यात बाप्पांची घरी आरास केलेल्या मखरात प्रतिष्ठापना करतात. यंदा शुक्रवारी बाप्पांचा उत्सव साजरा होत असून तालुक्यात सार्वजनिक मंडळांनी रात्रीचा दिवस करून मखरांची आरास करण्यास सुरूवात केली आहे. माघी गणेशोत्सवात सर्वाधिक नवस केलेल्या बाप्पांची संख्या अधिक आहे. बाप्पासमोर एखादा बोललेला नवस पूर्ण झाला की बाप्पांची ५ वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली जाते. तसेच बाप्पाला बोलल्याप्रमाणे नवस पूर्ण झाला की ५ वर्षांनंतर काही भाविक गणपती आणणे बंद करतात. असे असले तरीदेखील वसई-विरारमध्ये बाप्पांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे.मागील वर्षी वसई तालुक्यात ३ हजार १४५ बाप्पांचे आगमन झाले होते. त्यात ३५ सार्वजनिक तर ३ हजार ११० घरगुती बाप्पा होते. यंदा हे प्रमाण ७५ ने वाढले आहे. माघी गणेशोत्सव असला तरी काही भाविक दीड दिवसांसाठी, अडीच दिवसांसाठी किंवा पाच दिवसांसाठी बाप्पांची प्रतिष्ठापना करतात. सार्वजनिक मंडळांकडून या काळात भाविकांसाठी खास मनोरंजनपर कार्यक्र म, सांस्कृतिक कार्यक्र म आयोजित केले जातात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकVasai Virarवसई विरार