शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वसई महसूल विभागाने आवळल्या रेतीमाफीयांच्या मुसक्या; पंप ,इंजिन अन् पाईप केले नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 09:52 IST

खानिवडे,चिमणे खर्डी, वैतरणा आणि कोपर या रेतीबंदरावरील विविध असे 25 सक्शन पंप ,इंजिन व पाईप नष्ट करण्यात महसूल विभागाला आले यश

- आशिष राणे

वसई- कोविड काळात पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या विविध रेतीबंदरावर महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते त्याचाच फायदा वसई विरारच्या पूर्वेतील रेतीमाफियांनी घेतला होता मात्र तक्रारी वाढल्यावर पालघर जिल्हा प्रशासनाचे बंद डोळे उशिरा का होईना ते उघडले व त्यानंतर  सोमवार (दि.6) वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या नेतृत्वाखाली रेती माफीयांची सर्वच साहित्य नष्ट करण्यासाठी एक संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेत  तहसीलदार वसई  यांनी आपल्या तलाठी व मंडळ अधिकारी आणि अन्य महसूल कर्मचारी वर्गांच्या मदतीने सोमवारी दिवसभर  रेतीबंदरवर भेटी दिल्या आणि तेथील रेती व बोटी संदर्भातले उपलब्ध साहित्य नष्ट व निकामी केल्याची माहिती वसईचे नायब तहसीलदार उमाजी हेळकर यांनी लोकमतला  दिली

वसई महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वसई  विरारच्या खानिवडे सहित अन्य तीन अशा चिमणे खर्डी, वैतरणा आणि कोपर रेती बंदरावर वसई प्रांत यांच्या मार्गदर्शनखाली वसई तहसीलदारांनी दि.6 सप्टेंबर रोजी दिवसभर ही कारवाई मोहीम राबवली या एकूणच कारवाईत लाखों रुपये किंमतीचे जवळपास 25 सक्शन पंप, सक्शन पाईप,नष्ट करण्यात आले तसेच बोट इंजिन,सक्शन पंप इंजिन देखील साखर टाकून निकामी करण्यात आले.

दरम्यान या धडक कारवाईसाठी वसई प्रांताधिकारी  स्वप्नील तांगडे यांच्या समवेत वसई तहसीलदार उज्वला भगत तसेच मेरी टाइम बोर्डाचे साटलेकर यांच्या उपस्थितीत  महसूल विभागाचे 30 तलाठी 6 मंडळ अधिकारी आणि अन्य महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दिवसभर रेतीबंदरावर उपस्थित होता. एकूणच पालघर जिल्ह्यासहित पालघर व वसई तालुका महसूल प्रशासनाने अति दुर्लक्ष केल्यानंतर विषयाचे गांर्भीय लक्षात घेऊन नागरिकांच्या तक्रारीवरून ही मोहीम राबविण्यात आल्याची चर्चा दिवसभर ऐकू येत होती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार