शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

वसई महापालिका परिवहन सेवेला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:30 IST

वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन सेवेला बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याचे प्रकरण आता थेट लोकायुक्तांच्या दारात गेल्याने पालिकेच्या परिवहन सेवेला चांगलाच दणका मिळाला आहे.

वसई : वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन सेवेला बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याचे प्रकरण आता थेट लोकायुक्तांच्या दारात गेल्याने पालिकेच्या परिवहन सेवेला चांगलाच दणका मिळाला आहे.या प्रकरणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी महापालिका व शासन दरबारी अनेक तक्र ारी केल्या, मात्र भट यांची कुठेही दाद न लागल्याने शेवटी त्यांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे दाखल केले असता उपलोकायुक्तांनी वसई - विरार शहर महापालिकेला या परिवहन सेवा करार प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेणं, चांगल्या बसेस देणे, बसेसचे वेळापत्रक तयार करून त्या वेळेवर सोडणे आदी परिवहन सेवेशी संबंधित आदेश यावेळी उपलोकायुक्तांनी दिले आहेत. दरम्यान वसई विरार महापालिकेने २०१२ मध्ये मे. भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या खाजगी ठेकेदारा मार्फत परिवहन सेवा सुरू केली होती.या परिवहन सेवेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या परिवहन सेवेने कराराचे उल्लंघन केले असून प्रवाशांना आजही निकृष्ट सेवा दिली जात आहे, असा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे. याविरोधात त्यांनी सातत्याने दोन वर्षे महापालिका, परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्र ारी केल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अखेरीस त्यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती, परिणामी त्यावर नुकतीच सुनावणी झाली असता उपलोकायुक्तांनी या प्रकरणी पालिकेला चांगलेच फटकारले आहे. शासनाची मान्यता डावलून ही करारवाढ वसई विरार महापालिकेने २०११ मध्ये खाजगी ठेकेदाराकडून परिवहन सेवा सुरू करण्यासंबंधि परवानगी म्हणून मागितली मात्र खाजगी पध्दतीने ही सेवा असल्याने शासनाने विविध अटी देऊन पालिकेला केवळ ५ वर्षांसाठी ही मान्यता दिली होती. २०१२ मध्ये परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर शासनाच्या मान्यतेप्रमाणे २०१७ मध्ये ती संपुष्टात येणार होती.परंतु महापालिकेने शासनाची संमतीच न घेता परस्पर १० वर्षांच्या कराराला मान्यता दिलीच कशी, असा सवाल त्यांनी आपल्या तक्र ारीत केला आहे.>अर्जदाराचा नेमका आरोप काय आहे?करारानुसार ठेकेदाराने पहिल्या ३ वर्षांत ४०० बसेस देणे बंधनकारक होते. करारनाम्यातील अट क्रमांक ४ नुसार बस ठेकेदाराने पहिल्या टप्प्यात ५० नवीन बसेस सुरू करणे आवश्यक होते. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात १०० या प्रमाणे टप्प्या-टप्प्याने ४०० बसेस ३ वर्षांत सुरू करणे आवश्यक होते. पंरतु सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात परिवहन सेवेकडे 86 बसेस, सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ या वर्षात ११९ बसेस होत्या. करारनाम्यातील अटीनुसार सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात अनुक्र मे २०० आणि ४०० बसेसची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. ठेकेदाराने 3 वर्षांत बसची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. कमी बस असल्याने अनेक मार्गावर पालिकेला बससेवा देता आली नाही. या बसपोटी ठेकेदार पालिकेला प्रति बस 1 हजार रु पये स्वामित्वधन देणार होता. मात्र बसेस नसल्याने पालिकेला बसच्या स्वामित्व धनापोटी मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागले आहे.>पुढील सुनावणी ५ आॅगस्टला : जाहिरात काढून मुदतवाढ दिल्याचे पत्र शासनाला पाठविल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मात्र पालिकेला त्या अनुंषगाने कागदपत्रे सादर करता आली नसल्याने उपलोकायुक्तांनी पुढील महिन्यापर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. महापालिकेकडून या प्रकरणासाठी विरार मुख्यालयातील उपायुक्त गवस हजर होते. पुढील सुनावणी ५ आॅगस्ट रोजी होणार आहे.