वसई : वसई-विरार उपप्रदेशात २ दिवसापासून पावसाला पुन्हा सुरूवात झाली असली तरी ढगाळ वातावरणामुळे मात्र प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली आहे. गेल्या २ दिवसापासून पहाटेच्या सुमारास उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे. मात्र सकाळी ९.३० नंतर हा पाऊस थांबतो. त्यानंतर मात्र वसईकर नागरीकांना प्रचंड उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. आज येथील तापमान ३१ सेंटीग्रेडवर गेले आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे नागरीक हैराण झाले आहेत. अशावेळी वीजपुरवठाही अधूनमधून खंडीत होत असल्यामुळे येथील नागरीकांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. दिवसभरातून ५ ते ६ वेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्याचा परिणाम व्यापार उदीमावर तसेच कार्यालयीन कामकाजावरही जाणवू लागला आहे. (प्रतिनिधी)
वसई - विरार उपप्रदेशात उष्म्याचा कहर
By admin | Updated: September 14, 2015 03:41 IST