शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यांचा वसईत धुमाकूळ; विरार, नालासोपारा, माणिकपूर, तुळिंज भाग टार्गेटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:05 IST

वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बंद घराचे दरवाजे फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून घरफोड्या करणाऱ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे.

नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बंद घराचे दरवाजे फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून घरफोड्या करणाऱ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. या घरफोड्या करणाऱ्या चोरांवर अंकुश लावण्यात पालघर पोलीस अपयशी ठरले असून या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. विरार, नालासोपारा, माणिकपूर आणि तुळींज या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घरात घरफोडी झाल्याचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास करत आहे.विरार पूर्वेकडील गीतांजली शाळेजवळील नाना नानी पार्कजवळ असलेल्या ओमसाई वेलफेअर सोसायटीच्या चाळ नंबर १ मधील रूम नंबर ६ मध्ये प्रफुल्ल रामदास पवार (३२) हे राहतात. शनिवार ते मंगळवार या दरम्यान घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटामधून १ लाख ५ हजार रु पये किंमतीचे साडे तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, १७ हजार रु पये किंमतीचे साडे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १२ हजार रु पये किंमतीचे ४ ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील पट्या, ७ हजार ५०० रु पये किंमतीचे सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ४१ हजार ५०० रु पयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा गावातील कल्पना नरोत्तम पाटील यांच्या मालकीच्या स्वप्न साफल्य बंगल्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी घरफोडी करून ३० हजार रु पये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन आणि ४५ हजार रु पये रोख रक्कम असा एकूण ७५ हजारांची चोरीप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील यशवन्त गौरव येथील सी ग्रेप्स इमारतीच्या एच/७०१ मध्ये राहणाºया योगेश्वर मोरेश्वर इस्वलकर (५१) यांच्या घरी सोमवारी दिवसाढवळ्या कोणी नसताना अज्ञात चोरांनी घरफोडी केली आहे.चोरांनी ४५ हजार रु पये किंमतीचा दीड तोळे वजनाचा सोन्याचा हार, ४५ हजार रु पये किंमतीचे दीड तोळे वजनाचे कानातील कर्णफुले व पट्ट्या, २१ हजार रु पये किंमतीची सात ग्राम वजनाची कानातील कर्णफुले, १५ हजार रु पये किंमतीची पाच ग्राम वजनाची कानातील कर्णफुले आणि २० हजार रु पये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील एव्हरशाईन येथील वंशदावन कॉम्लेक्स मधील सिल्वर ओक इमारतीच्या रूम नंबर ए/14 मध्ये राहणाºया हितेन मनोजभाई हरसोरा (३४) यांच्या घरी सोमवारी कोणी नसताना दिवसाढवळ्या चोरी झाली आहे.बंदोबस्ताची मागणीवसई तालुक्यातील विरार, नालासोपारा, माणिकपूर व तुळींज पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये चारांनी धुमाकुळ घातला आहे.या विरोधात लवकरच कडक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांनी केली असून संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :theftचोरी