शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत एमआयएमची एण्ट्री व्हाया नालासोपारा

By admin | Updated: February 21, 2016 02:29 IST

शहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत.

- शशी करपे,  वसईशहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत. एमआयएमचा वसईत नालासोपारामार्गे शिरकाव होत आहे. रविवारी एमआयएमने नालासोपाऱ्यात एका बैठकीचे आयोजन केले असून त्यात आमदार वारीस पठाण आणि एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल शेख मार्गदर्शन करणार आहेत. एमआयएमला नालासोपारा शहरात जाहीर सभा आणि त्यानिमित्ताने सोपाराफाटा ते शहरापर्यंत मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी एमआयएमकडून नालासोपारा पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी दोन्ही परवानग्या नाकारल्या होत्या. त्यानंतर, मुस्लीम समाजातील प्रश्नांसंबंधी शहरातील समाजातील लोकांशी संवाद साधण्यासाठी बैठक घेण्यास मागितलेली परवानगी पोलिसांनी दिली आहे. परवानगी देताना नालासोपारा पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्यांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नालासोपारा येथील साईनगरमध्ये ही सभा होणार आहे. त्यासाठी एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि प्रदेशाध्यक्ष अब्दुल शेख उपस्थित राहणार आहेत. या वेळी दोन्ही नेते मुस्लीम समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत, अशी माहिती एमआयएमचे पालघर जिल्हाध्यक्ष तलहा मासलिया यांनी दिली. तालुक्यातील बहुसंख्य मुस्लीम समाज सध्या बहुजन विकास आघाडीसोबत आहे. एमआयएमने तालुक्यात राजकीय काम सुरू केले, तर मात्र त्याचा फटका आघाडीला बसणार आहे. म्हणूनच रविवारच्या बैठकीत नेमके काय घडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एमआयएम मजबूत पर्याय म्हणून तालुक्यातील मुस्लीम नेते कोणती भूमिका घेतात, यावर एमआयएमचे वसईतील अस्तित्व ठरणार आहे.विश्व हिंदू परिषदेचा विरोध या कार्यक्रमाची कुणकुण लागताच विश्व हिंदू परिषद आणि हिंदू धार्मिक संघटनांनी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना भेटून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, अशी मागणी केली. एमआयएमचे नेते फक्त सामाजिक समस्या जाणून लोकांना मार्गदर्शन करणार आहेत, असे मासलिया यांनी सांगितले. एमआयएम राजकीय पक्ष असल्याने त्यांना बैठकीची परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य घडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे स्थानिक कार्यकर्त्यांना बजावण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिलीस्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र इन्कारवसई तालुक्यातील नालासोपारा शहरात मुस्लीम समाजाची मोठी संख्या असून त्याखालोखाल वसईगाव, पापडी, वालीव, पेल्हार, संतोष भुवन आणि विरार परिसरात लोकसंख्या विखुरली गेली आहे. येथील मुस्लीम समाजातील काही नेत्यांचा हळूहळू एमआयएमकडे कल वळू लागला आहे. त्यामुळे एमआयएमने वसईवर आता लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी नालासोपारा शहरात एमआयएमचे नेते येत असून शुक्रवारी तालुक्यातील काही मशिदींमध्ये या बैठकीसंबंधी माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.