शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धोकादायक इमारतीमध्ये लसीकरण, भंडाऱ्याच्या जीवघेण्या घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बेफिकीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 08:07 IST

ग्रँड मेडिकल महाविद्यालय व सर जे.जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या प्रसूतिगृहाची इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरने केलेल्या संरचनात्मक परीक्षणामध्ये (स्ट्रक्चरल ऑडिट) धोकादायक ठरविण्यात आलेली आहे.

हितेन नाईक -पालघर : जिल्ह्यातल्या कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात जे.जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयाच्या धोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतीतून करण्यात आली. भंडारा येथील जीवघेण्या घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बेफिकीर असल्याचेच यातून दिसून आले. उद्घाटनादरम्यान प्रशासनाचे बिंग फुटेल या भीतीमुळे पोलिसांद्वारे पत्रकारांना इमारतीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.ग्रँड मेडिकल महाविद्यालय व सर जे.जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या प्रसूतिगृहाची इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरने केलेल्या संरचनात्मक परीक्षणामध्ये (स्ट्रक्चरल ऑडिट) धोकादायक ठरविण्यात आलेली आहे. दुसरीकडे या रुग्णालयातील विद्युत वितरणाच्या वायर्सला अनेक ठिकाणी जोडणी करण्यात आली असून, विद्युत बोर्ड सताड उघडे असल्याची गंभीर परिस्थिती दिसून आली. त्यामुळे भंडारा येथे झालेल्या जीवघेण्या घटनेतून प्रशासनाने काही बोध घेतल्याचे दिसून आलेले नाही.सळ्या बाहेर आलेला सज्जा, भेगा पडलेल्या भिंती, इमारतीत लोंबकळणाऱ्या वायर्स आणि दरवाजे तुटलेले मीटर्स बॉक्स अशा जीवघेण्या धोकादायक अवस्थेतील इमारतीमध्ये शेकडोंच्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना कोणाची? याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे.दुसऱ्या ठिकाणी प्रसूतिगृहात प्रसूती झालेल्या महिला आपल्या नवजात अर्भकाला घेऊन धोकादायकरीत्या आजही वास्तव्य करीत आहेत. महिन्याला ४० ते ४५ महिलांची प्रसूती आजही सुरू असून, धोकादायक इमारत म्हणून घोषित करूनही बेफिकीरपणे गरीब, उपेक्षित महिलांच्या प्रसूती आजही बिनदिक्कतपणे केल्या जात असताना दंत चिकित्सा, लसीकरण, एनसी क्लिनिक आजही सुरू आहेत. अशा वेळी दुर्दैवाने एखादी जीवघेणी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. प्रशासनाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांना इमारतीमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आरोग्य विभागाचे आदेश होते की नव्हते?लसीकरण मोहिमेदरम्यान पत्रकारांना प्रवेश देऊ नये, असे आदेश महाराष्ट्र राज्य मुंबई, आरोग्य विभागाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामास्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या पालघरच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत महाराष्ट्र राज्य मुंबईच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधला असता असे कुठलेही आदेश आम्ही दिले नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या