शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

आदिवासींच्या कौशल्याचा जीवनमान उंचावण्यासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:38 IST

वनोपजातून रोजगारनिर्मिती

हुसेन मेमनजव्हार : जंगलात निर्माण होणाऱ्या गौण वनोपजाच्या आधारे चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करता येणे शक्य आहे. या माध्यमातून कोकण भागातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री जनधन विकास योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जंगलात निर्माण होणाऱ्या गौण वनोपजावर आदिवासींच्या परंपरागत ज्ञानाचा, कौशल्याचा तसेच त्यासोबत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गौण वनउपजवर प्रक्रिया करणे व त्यांचे मूल्य संवर्धन करून विक्री करणे, त्यामुळे आदिवासींचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री वनधन विकास केंद्र ही योजना केंद्र शासनाच्या जनजाती कार्य मंत्रालयाने कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्रातील किमान ७० टक्के सभासद अनुसूचित जमातीचे असलेल्या स्वयंसहायता गटाच्या साह्याने ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सुमारे २२० वर्धन विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

वनधन विकास केंद्र स्थापन करण्यासाठी जवळपासच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीतजास्त २० लाभार्थी मिळून एक स्वयंसहायता गट स्थापन करता येणार आहे. असे १५ स्वयंसहायता गट स्थापन करून एक वंदन विकास केंद्र तयार होईल. गट हा गाव पातळीवरील अथवा आजूबाजूच्या गावातील असावा. यामध्ये ७० टक्केपेक्षा अधिक लाभार्थी हे आदिवासी समाजाचे असावेत, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ पेसा किंवा वन हक्क कायदा अंतर्गत ग्रामसभेच्या मान्यतेने स्थापन केलेली समिती किंवा स्वतः ग्रामसभा आदिवासी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान किंवा स्वयंसेवी संस्था यांचे अस्तित्वात असलेले गट हे वर्धन स्वयंसहायता गटाचे कार्य करू  शकतात. वनोपजमध्ये समाविष्ट नसलेल्या सीताफळ, जंगली आले, फणस, समिधा, पळस पान व कृषी उपाय इत्यादींचे मूल्यवर्धन करणे या बाबी ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. 

उदरनिर्वाहाचे लाभले साधन  कोरोना संकटात वनधन योजना आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ठरत आहे. योजनेच्या माध्यमातून १९ हजारपेक्षा अधिक आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे. 

प्रधानमंत्री वनधन योजना ही आदिवासी भागातील रोजगार वाढवून देणारी योजना आहे. कोकण विभागातील सहा जिल्ह्यांतील आदिवासी बांधवांनी गट करून या योजनेचा लाभ घ्यावा. जंगलात सहज उपलब्ध होणाऱ्या वनोपजामुळे रोजगार वाढीस लागून, कुपोषण आणि स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे.- राजेश पवार, कोकण विभागीय शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, जव्हार.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार