शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

अणुऊर्जा केंद्राजवळ अनोळखी वस्तू

By admin | Updated: August 28, 2015 00:11 IST

देशातील अतिशय संवेदनशील असे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपासून जवळच असलेल्या तारापूर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे

- पंकज राऊत,  बोईसरदेशातील अतिशय संवेदनशील असे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपासून जवळच असलेल्या तारापूर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे एक अनोळखी उपकरण वाहत आल्याची माहिती तारापूरच्या दक्ष नागरिकांनी पोलिसांना दिली. ते उपकरण पोलिसांनी ताब्यात घेऊन एका मैदानात ठेवून ठाण्याच्या बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅण्ड डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीने निष्क्रिय केले. तेव्हा त्या उपकरणातून हवेत प्रचंड धुरासह फटाक्यांतील रॉकेटसदृश वस्तू प्लॅस्टिक दोरीसह हवेत सुमारे पाचशे मीटर उडाली.तारापूर येथील मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा तटरक्षक दलाचे सदस्य भुवनेश्वर दवणे, भालचंद्र दवणे, मोहन दवणे व सुरेश मेहेर जाळे घेऊन तारापूर समुद्रकिनारी मच्छीमारीसाठी जात असता त्यांना किनाऱ्यापासून काही अंतरावर एक लाल रंगाची प्लॅस्टिक बादलीसारखी वस्तू दिसली. ही बादली सरळ करून त्यावरील सफेद रंगाचे झाकण काढून पाहिले असता त्यामध्ये दोन वायरी आतील उपकरणाला जोडलेल्या दिसल्या. त्याबाबत वेगळाच संशय आल्याने त्या जागृत मच्छीमारांनी त्वरित तारापूर पोलिसांना कळवून ते उपकरण पोलिसांच्या ताब्यात दिले. ती वस्तू पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. तारापूर पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी प्रसंगावधान राखून हे उपकरण देलवडी येथील मोठ्या मैदानावरील मोकळ्या जागेत ठेवून वाळूची पोती बाजूला ठेवली. प्रथम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन श्वान पथकांना पाचारण केले. त्या श्वान पथकांकडून या उपकरणात स्फोटक वस्तू असल्याची खात्री पटताच बोईसर विभागाचे पोलीस विभागीय अधिकारी विशाल गायकवाड यांनी ठाणे येथील बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅण्ड डिस्पोजल स्क्वॉड (बीडीडीएस) ला बोलावले.असे केले उपकरण निष्क्रियबीडीडीएस दीड वाजता घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रथम त्यांनी त्या उपकरणाचे बाह्य निरीक्षण केले. नंतर, सिंधवार व बिजली या श्वान पथकांकडून पाहणी करून घेतली. त्या श्वान पथकांनी त्या उपकरणाचा वास घेऊन यात स्फोटके असू शकतात, असा इशारा देताच त्यांच्याजवळील पोर्टेबल मशीनने उपकरणाचा एक्स रे काढला. त्या एक्स रे मध्ये उपकरणामधील मॅकॅनिझम कळून एक स्टीलचा रॉड वायरिंगच्या सर्किटमध्ये असल्याचे दिसले. त्या उपकरणाबाहेर आतील यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता एक पूलस्वीच हॅण्डल मध्ये होते. तो पूलस्वीच खेचताच प्लॅस्टिक दोरीला बांधलेला एक स्टीलचा रॉड धुरासह हवेत सुमारे पाचशे मीटर उंच फटाक्यातील रॉकेटसारखा प्रचंड प्रेशरने उडून दोरीसह दूर जाऊन खाली पडला. ही प्रक्रिया सुमारे दीड तास चालली.बॉम्बची अफवा किनाऱ्यावर सापडलेल्या अनोळखी उपकरणाला बॉम्ब स्क्वॉड पथकाने निष्क्रिय केले उपकरणातून हवेत ५०० मीटर प्रचंड धुरासह उडाली रॉकेटसदृश वस्तू सीआयएसएफ, बॉम्ब स्क्वॉड पथकाच्या चार श्वानांना पाचारणतारापूरच्या दक्ष नागरिकांनी अनोळखी वस्तूची पोलिसांना दिली माहितीमोकळ्या मैदानात उपकरण केले निष्क्रियपरिसरात बॉम्ब सापडल्याची अफवाउपकरणाबाबत पोलीस व बॉम्ब स्क्वॉड पथकही अनभिज्ञमोठ्या जहाजातील सागरी सिग्नल यंत्रणा असल्याचा प्राथमिक अंदाज