शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:54 IST

 पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

- वसंत भोईरवाडा :  पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र २०२० वर्षाचा मागोवा घेताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि अवकाळीच्या दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागले. खरीप हंगामाच्या काळात या वर्षी लांबलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातील रब्बी हंगामातील कडधान्य पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या धक्क्यातून शेतकरीराजा अद्याप सावरलेला नाही. 

भातखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक

अवकाळीमुळे भातपिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातूनही जे काही हाती लागले आहे, ते भात खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. काही केंद्रांवर पोती नाहीत, तर काही ठिकाणी भात चांगले नसल्याने ते घेतले जात नाही. महामंडळाचे अधिकारी आणि मिलर यांचे साटेलोटे असल्याने केंद्रावर नेऊनदेखील भात दर्जेदार नसल्याचे कारण सांगून भात खरेदी करत नाहीत. त्यामुळे तेच भात मिलर मातीमोल किमतीत खाजगीमध्ये खरेदी करीत आहेत. 

कर्जफेड करणारे उपाशी 

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कृषी कर्जमाफीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रूपयांचा सरकारी लाभ देण्याचे घोषित केले होते, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना हा लाभ अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे कर्ज थकविणारे तुपाशी,  तर कर्जफेड करणारे उपाशी अशी  शेतकऱ्यांची अवस्था आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी