शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील युनेस्को स्कूल क्लब चळवळ अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:12 IST

देशात यूनेस्को स्कूल क्लबची स्थापना करणारी पहिल्या जिल्हा परिषद शाळेचा मान डहाणूतील गोवणे शाळेला मिळाला आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी  - देशात यूनेस्को स्कूल क्लबची स्थापना करणारी पहिल्या जिल्हा परिषद शाळेचा मान डहाणूतील गोवणे शाळेला मिळाला आहे. या शाळेचे उपक्र मशील शिक्षक विजय पावबाके यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ३५० हून अधिक यूनेस्को स्कूल क्लब स्थापन झाल्याने जपानसह चीन, व्हीएतनाम आदी राष्ट्र पिछाडीवर पडले आहेत.१९४७ साली जपानमध्ये यूनेस्कोची पहिली असोसिएशन स्थापन झाली. आजतागायत आंतरराष्ट्रीयस्तरावर शंभरहुन अधिक देशात चार हजारहुन अधिक यूनेस्को क्लब व असोसिएशन्स निर्माण झाल्या आहेत. या स्कूल क्लब अंतर्गत विविध स्पर्धा कल्चरल एक्सचेंज व स्टडी टूर या उपक्र मांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय व्यासपीठ उपलब्ध होते. एका राष्टÑीय परिषदेत यूनेस्कोचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष डॉ. धीरेन्द्र भटनागर यांच्यकडून ही माहिती शिक्षक विजय पावबाके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्व नियमावली जाणून घेवून पहिल्यांदा गोवणे शाळेत यूनेस्को क्लब स्थापित केला. त्यामुळे हा क्लब स्थापन करणारी गोवणे ही देशातील पहिली जि. प. शाळा ठरली.यूनेस्कोच्या माहिती पत्रकात दिल्ली व उत्तर भारताती अनेक खाजगी व उच्चभ्रू शाळा या योजनेचा लाभ घेत असल्याची नोंद आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळा या पासून वंचित होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेशी जोडता यावे म्हणून राज्य पातळीवर यूनेस्को स्कूल चळवळ सुरु करण्याचा विचार पावबाके याांनी केला.त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा व्हाट्सअ‍ॅप्प ग्रुप तयार करण्यात आला. त्याची लिंक राज्यभरातील शैक्षणिक ग्रुपवर पोस्ट करून उपक्र मशील शाळांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहान करण्यात आले.या ग्रुप मार्फत त्यांना यूनेस्को स्कूल क्लबची माहिती दिली. त्यानंतर राज्यभरातून एकूण दोनहजारा पेक्षा अधिक शाळा या ग्रुपशी जोडल्या गेल्या. त्यानंतर डॉ. भटनागर यांच्याकडून मेंबरशिप फॉर्म मागवून सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, सर्व शाळांची मोफत नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून सुमारे पावणे चारशे प्रस्ताव जमा झाले. ते सर्व मेल करण्यात आले. या सर्व शाळांना यूनेस्को स्कूल क्लब स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली.जबाबदार भावी ग्लोबल सिटीजन निर्माण होणे हे यूनेस्को स्कूल क्लबचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यात यूनेस्को स्कूल क्लबच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.- विजय पावबाके, राज्य समन्वयक, यूनेस्को स्कूल चळवळमहाराष्ट्रातील यूनेस्को क्लब चळवळसाठी विजय पावबाके यांनी राज्य समन्वयक म्हणून काम केले. वर्ष २०१९ मध्ये यूनेस्को क्लब चळवळ त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सुरु झाली.- डॉ. धीरेन्द्र भटनागर, अध्यक्ष,वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूनेस्को क्लब

टॅग्स :Vasai Virarवसई विरार