शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बहुसंख्य ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 15:34 IST

तौक्ते चक्रीवादळाने वसई मंडळात महावितरणचे ३ कोटी ७२ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या वसई मंडळात वीज वितरण यंत्रणेचे जवळपास ३ कोटी ७२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ४१ हजार ग्राहकांपैकी १२०० वगळता सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

महावितरणचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या कामगारांनी बिकट परिस्थितीत अहोरात्र काम करून ही कामगिरी केली आहे. महावितरणच्या वसई मंडळात वसई व वाडा तालुका, वसई-विरार महापालिका, नालासोपारा आदी भागातील ९ लाख ७० हजार वीज ग्राहक आहेत. १७ मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने उच्चदाब वाहिनीचे २१०, लघुदाब वाहिनीचे ६४२ विजेचे खांब पडले किंवा वाकले. तर ३८ रोहित्र व ४७ मिनी पिलर नादुरुस्त झाले. उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या तुटून पडल्या. यातून महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे ३ कोटी ७२ लाखांचे नुकसान होऊन २ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.

चक्रीवादळाचा प्रभाव ओसरण्यापूर्वीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामांवर मर्यादा आल्या.  विपरीत परिस्थितीतही अविरत दुरुस्तीचे काम करत महावितरणचे अभियंते, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार यांनी शक्य त्या मार्गाने ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. यात ३१ कोविड रुग्णालये, दोन ऑक्सिजन प्रकल्पांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. रविवारी दुपारपर्यंत १२०० ग्राहक वगळता सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.  कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल वादळानंतर वसईत तळ ठोकून होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार