शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन रोखणार

By admin | Updated: September 30, 2016 03:08 IST

वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे रस्त्याखालील २७ ग्रामपंचायतीचे क्षेत्र पेसा अंतर्गत येणार असल्याने स्थानिकांच्या जमिनी मोठया प्रमाणात जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भुमापन

- शुभदा सासवडे, पालघर/सफाळेवडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे रस्त्याखालील २७ ग्रामपंचायतीचे क्षेत्र पेसा अंतर्गत येणार असल्याने स्थानिकांच्या जमिनी मोठया प्रमाणात जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भुमापन करून देणार नाही असा इशारा शेतकरी संघर्ष समिततीने दिला आहे. या कामासाठी वैती, पंदण, पारगाव धुकटण आणि वसरोली या पाचा गावांची निवड करण्यात आली आहे.नावझे येथे नुक त्याच झालेल्या बैठकीत भुमापन न होऊ देण्याचानिर्णय घेण्यात आला. या बाबत पालघर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १ जानेवारी २०१७ पासून केंद्र सरकार वडोदरा-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाला सुरूवात करणार आहे. पालघर जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने या रस्त्याला कडाउून विरोध केला असून जनजागृती केली जात आहे. सुमारे ३८० किलो मिटरचा हा रस्ता ३० फुट उंचावर असणार आहे. नावझे आणि अन्य गावात पाच महिन्यांपूर्वी भुमापन करण्यासाठी आलेलैया काही अधिकाऱ्यांना शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समितीने माघारी पाठवले होते. द्रुतगती महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या समिनी संपादित केल्या जाणार असून काही जणांना तर आपली स्वत:ची घरे देखिल गमवावी लागली आहेत. त्यामुळे या गावातील स्थानिक लोकांनी या प्रकल्पला कडाडून विरोध केला आहे. असा ठराव सुध्दा ग्रामस्थांनी पालघर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. पारगाव, वैती, पेणद, धुकटण आणिवसरोली या पाच गावांत भुमापन होऊ दिले जाणार नाही असा निर्णय या पार्श्वभुमीवरून संघर्ष समितीने घेतला आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांना सादर केले. भुमापनाबाबत शेतकऱ्यांना नोटीस दिलेली नाही. शेतातून मापन केल्यास भाताच्या पिकाचे नुकसान होईल. त्याची झालेली नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या बळावर कोणत्याही परिस्थित भुमापन करू दिले जाणार नाही असा निर्धार शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष विश्राम पावडे यांनी व्यक्त केला आहे.पुरुषांच्या बरोबरीला महिलाही रस्त्यावरभूमीच्या रक्षणासाठी ऊन, तहान, भुक याची तमा न बाळगता सकाळी सकाळी नऊच्या सुमारास घरातील पुरुष मंडळीच्या सोबत पदर कंबरेला खोचून महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. स्थानिक लोकांच्या भावना दुखावणारया आणि त्यांच्या विकासासाठी उपयोगी न ठरणाऱ्या वडोदरा- मुंबई एक्स्प्रेस वे च्या भूमापनाला शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार विरोध करण्यासाठी गुरुवारी शेकडो शेतकरी पुरूष व महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.गुरु वारी पारगाव, पेणंद, वैती , धुकटण आणि वसरोली या गावांमध्ये भूमापनासाठसाठी उपविभागीय अधिकारयांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात भूमापन अधिकारी , तलाठी व इतर कर्मचारी येणार होते. ही मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ नये तसेच आमची जागा या प्रकल्पासाठी देण्यास शेतकरी तीव्र विरोध दर्शवित असतांनाही जबरदस्तीने भूसंपादन करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. वरील ठिकाणी गुरु वारी सकाळ पासूनच शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.वरील सर्व गावे पैसा कायदा अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत च्या हद्दीत येत असल्याने या ग्रामपंचायतीने त्या विरोधात ठराव करून उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांना दिले होते. मात्र सर्व ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीचा विरोध पाहून कोणीही अधिकारी आले नाहीत. यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठयÞा संख्येने उपस्थित होते .