शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी मोडून सत्तेचा माज उतरवणार, उद्धव यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 06:43 IST

नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी वसई मधील गुंडगिरी मोडून काढून सत्तेचा माज उतरविणार असल्याची भाषा विरोधंकाबाबत केली आहे. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर, उमेदवार राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे, विवेक पंडित, रवींद्र फाटकसह अनेक महायुतीचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

वसईमध्ये काही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, साहित्यिक, शिक्षक आदींची व्यथा आणि समस्यां एकण्याकरिता भेट असल्यामुळे दोन तास उशीर झाल्याने दिलिगरी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. २५ वर्षे सत्ता भोगूनही वसईमधील सामान्य लोकांच्या व्यथा आणि समस्यां अजून पर्यंत का नाही सोडवल्या, २९ गावे वगळण्याचा प्रश्न किंवा त्या गावातील लोकांना मनपात सामील व्हायचे नसतानाही जबरदस्तीने मनपा त्यांच्यावर का लादता ? असे अनेक प्रश्न विरोधकांना विचारले आहे. भर उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघून आनंदी झालो असून कार्यकर्ते विचाराने तापलेले असून उन्हाने नाही, गुंडगिरीने तापलेले आहे, लोकांची सहशीलता संपली असून ते तुम्हाला तुमची जागा दाखवून युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. या परिसरातील गुंडगिरी मोडून काढणार, संपवून टाकणार पण हे अशी थेट टीका आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर केली.

नाणार प्रकल्प नको म्हणून गावकऱ्यांनी माझी भेट घेतल्यावर शिवसेनाने नाणार प्रकल्पाविरोधात उभे राहून हा प्रकल्प होऊ दिला नाही व तो रद्द झाल्याचा आदेशही काढला आहे. तरी काही विरोधक अपप्रचार करत आहेत. विरोधी पक्ष सरकार ज्यांचे येते त्यांच्याकडे जाऊन पाया पडत माझ्यावरील असलेले गुन्हे व केसेस काढून टाकण्यासाठी स्वत: पाया पडतात. स्वत:ची कातडी त्यांनी आजपर्यंत वाचवली असून लोकांच्या समस्या आणि व्यथा सोडवल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHitendra Thakurहितेंद्र ठाकूरpalghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019