शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उचाट ग्रामपंचायत १० वर्षे सरपंचाविना, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:04 IST

वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे.

वसंत भोईर वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे. आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने व गावात संबंधित जातीचे रहिवासी नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीत त्यातील उमेदवार निवडून येत नसल्याने पद रिक्त आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नियमाच्या पलीकडे काही करता येत नसल्याने ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून प्रशासक हाकतो आहे.वाडा तालुक्यातील उचाट हे कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसित गाव आहे. मतदार ५५० इतके आहेत. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदस्य संख्या ७ आहे. आता सरपंचपदासाठी एक जागा अतिरिक्त झाल्याने एकूण सदस्य संख्या आठ झाली आहे. येथे अनुसूचित जमाती साठी पाच जागा असून इतर मागास वर्ग (कुणबी) एक जागा आहे. व सर्वसाधारण दोन जागा असून असे एकूण आठ सदस्य आहेत. मात्र आरक्षित उमेदवार उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायतीची सदस्य पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचविना आहे.गेल्या पाच वर्षा पूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही आरक्षित जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने ग्रामपंचायतीची सर्व सदस्य संख्या रिक्त होती. तशीच परिस्थिती आत्ताच झालेल्या निवडणुकीतही झाली. या गावाच्या हद्दीत फक्त दोन घरे अनुसूचित जमातीच्या नागरिकांची आहेत. त्यामुळे पाच अनुसूचित जमातीचे उमेदवार या गावात उपलब्ध नाहीत. असलेले नागरिक नोकरीमध्ये असल्याने उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे.तसेच या ग्रामपंचायतीत एक सदस्य इतर मागासवगीॅयांकरिता आहे. मात्र या गावात एकही घर इतर मागासवगीॅयांचे नसल्याने हा उमेदवार मिळत नाही. उर्वरित दोन जागा या सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण समाजाचे उमेदवार येथे उपलब्ध आहेत. पण फक्त दोन उमेदवार असताना ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीशिवाय या तिचा कारभार हाकला जातो. प्रशासकाच्या हाती या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामस्थांनी सदरची बाब तहसील व जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या साच्याच्या विरोधात प्रशासनाला जाता येत नाही. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे.>यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र नियमाच्या पलीकडे त्यांना जात येत नाही. यासाठी आम्हाला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. या शिवाय आमच्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही.- प्रदीप मोरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत उचाट>वाडा हा आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामुळे येथे आदिवासी समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उचाट येथे आदिवासी समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असून येथे दोन ते तीन घरे आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाही. या ग्रामपंचायतीत उमेदवार अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक होऊ शकली नाही. पंधरा वर्षापासून येथे हीच परिस्थिती आहे.- विठ्ठल गोसावी,नायब तहसीलदार, वाडा