शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या दोन पोलिसांना गस्तीच्या वेळी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:00 IST

गुन्हा दाखल : चार आरोपींना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई आणि होमगार्ड शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना, चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई पोलिसांनी चारही आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

वसई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सौरभ दराडे (२५) आणि होमगार्ड अशोक चव्हाण हे दोघे शुक्रवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पापडी नाका येथे पेट्रोलिंग करत होते. कोरोनामुळे रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत जमावबंदी, कर्फ्यूचा आदेश असताना हर्षल एरल्ड नुनिस (२१), अबेद सायमन गोन्सालवीस (२२), राहुल राजेश चौबे (२१) आणि विकास गोपाळ धोबी (२१) हे चौघे जमून आरडाओरडा करत होते. त्यातील दोघे एका सलून दुकान मालकाच्या नावाने शिवीगाळ करत, बंद शटरवर दगडफेक करत दुकानाचा बोर्ड फाेडत होते. गस्तीवरील  पोलिसांनी चौघांना विचारणा केल्यावर दुकान मालकाचे आमच्या मित्राशी भांडण झाले असल्याने दुकानाची तोडफोड करतोय, असे त्यांनी सांगितले. 

दोघेही पोलीस जखमी पोलिसांनी आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी हर्षल याने शिवीगाळ करून अंगावर मारण्यासाठी धावून आला. दोन्ही पोलिसांना जमिनीवर पाडून पोलीस शिपायाची कॉलर पकडून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दोघेही पोलीस जखमी झाले, तर तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करून पोलिसांना मारा, अशी चिथावणी दिली.

टॅग्स :Policeपोलिस