शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन तास ‘चक्का जाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 07:48 IST

विविध संघटनांचा रास्ता रोको : सात-आठ किमीपर्यंत लागल्या गाड्यांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/मनोर : सरकारने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार यांना आपल्या जागा, जमिनी, व्यवसाय यापासून बेदखल करण्याचे धोरण आखले आहे.  हुकूमशाहीच्या दिशेने देश नेला जात असल्याने आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी एकता परिषद, भूमिसेना आणि मच्छीमार संघटनांनी मुंबई-अहमदाबाद मार्ग दोन तासांसाठी रोखून धरला. यावेळी सात-आठ  किमीपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. 

 आपल्या जमिनी विकण्यास भाग पाडले जात आहे. धनगर आरक्षण देताना आमच्यातील देऊ नका, असे काळूराम दोधडे यांनी सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार रमेश शेंडगे यांनी स्वीकारले. खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील व शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

काय आहेत मागण्या? धनगर समाजाला आदिवासी समाजाचे अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबर २०२३चा कंत्राटी तत्त्वावर नोकर भरतीसंदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा, महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांचे होणारे खासगीकरण बंद करावे, ६ जुलै २०१७च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सन्मान राखून अंमलबजावणी त्वरित करावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

धनदांडग्यांच्या हितासाठी कायदे लोकांविरोधात कायदे करण्याचा भडीमार सुरू असून, जो कायदा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असावा, तो मूठभर धनदांडग्या लोकांच्या हितासाठी केला जात आहे, असा आरोप करण्यात आला.