विरार : क्विकर या आॅनलाइन पॉर्र्टलद्वारे फसवणूक करणाºया दोघांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाखांचा माल जप्त केला.वेबसाइटवर २४ तास नोकर हवा, अशी जाहिरात देऊन या दोघांनी आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. विरार पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील एक आरोपी हा मूळचा दिल्लीचा आहे, तर दुसरा बिहारी आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
क्विकरद्वारे फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 05:07 IST