लोकमत न्यूज नेटवर्कविरार : अवैध बांधकामप्रकरणी अटकेतअसलेल्या भास्कर पुजारी या बिल्डरला न्यायालयाची परवानगी न घेताच रुग्णालयात दाखल केल्याने तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास भोसले यांच्याकडे होता. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळेस आरोपी बिल्डरला अचानक चक्कर आली. भोसले यांनी आरोपीला रु ग्णालयात दाखल केले होते. याबाबत त्यांनी न्यायालयाला न कळविल्याने न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढून संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे अटकेतील बिल्डर पुजारी याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर भोसले हे चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते. भोसले यांच्या विरोधात पालघरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी विभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल काकडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
तुळींजचे उपनिरीक्षक भोसले निलंबित
By admin | Updated: May 7, 2017 04:39 IST