शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवर सर्व आदिवासींना तूरडाळ, खाद्यतेल मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:56 IST

पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे.

मोखाडा : पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे. श्रमजीवीची २०१७-१८ पासून ही मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिले होते. कुपोषणाची दाहकता असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या कुपोषणाने प्रभावित तालुक्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. या प्रयोगाच्या यशानंतर ही योजना राज्यभर अंमलात येईल. आवश्यक पोषण घटकांच्या अभावामुळे आदिवासी मातांमध्ये कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे. हे श्रमजीवीने सरकार दरबारी मांडले होते. याबाबत अनेक प्रखर आंदोलने झाली. अखेर या योजनेला शासनाचा हिरवा कंदील मिळाला. १० जुलै २०१९ पासून या योजनेचा अंमल होणार आहे.पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न २०१६ साली पुन्हा ऐरणीवर आला होता. श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रस्त्यावर उतरून रान उठवले होते. दुसऱ्या बाजूला याबाबत उपाययोजना काय असाव्यात, याबाबतही श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडितांच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करून विवेक पंडित यांनी प्रत्यक्ष आदिवासींच्या भोजनात आवश्यक जीवनसत्त्व असलेले अन्नपदार्थ असावे असे सांगितले होते. त्यासाठी रेशनवर खाद्यतेल आणि तूरडाळ असावी, ही मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘‘वर्षा’’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा सचिवांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरही संघटनेने वारंवार याबाबत पाठपुरावा केला.श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गरजू गरीब आदिवासींचे मागणी अर्ज शासनाकडे दाखल केले होते. याबाबत आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जव्हार आणि मोखाड्यात या योजनेचा प्रयोग होणार आहे. पांढºया शिधा पत्रिका वगळून सर्व केशरी, पिवळ्या, अंत्योदय शिधा पत्रिकाधारक आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळणार असून या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरातील आदिवासींना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी हिताच्या घेतलेल्या या निर्णयाचे श्रमजीवीेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार