शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:10 IST

आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला

विक्रमगड - तालुक्यातील काही आदिवासी शिक्षकांनी एकत्र येत समाजमाध्यमाचा वापर करत आदिवासी समाजाची हरवत चाललेली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या काळात आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा हरवत असून मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या आलेला हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचावा म्हणून या शिक्षकांनी युट्युब चॅनलच्या माध्यमातून जल, जंगल अन धनतरी या गीताची निर्मिती केली आहे. हे गीत हजारो रसिकांनी पाहिले आहे.आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला असून निसर्गाशी असलेले त्यांचे भावबंध त्यांच्या कलांमधून आविष्कृत होत असतात. परंतु गेल्या काही वर्षात विविध माध्यमांतून झालेले सांस्कृतिक आक्रमण यामुळे आदिवासींचा मूळचा सांस्कृतिक वारसा हरवत चालल्याची भावना आदिवासी तरुणांमध्ये दिसत आहे. या भावनेतूनच तालुक्यातील प्रशांत नडगे, कमळाकर बिरारी, भगवान कुरकुटे, महेश भुसारे, मधुकर शेळके, दीपक मोर, सुनील लोखंडे आदी शिक्षकांनी एकत्र येत आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे म्हणून काही उपक्रम हाती घेण्याचे ठरवले. त्यातून रियल फ्रेंड युट्यूब चॅनलची संकल्पना पुढे आली. शिक्षकांच्या या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नाना अहिरे, विजय भोये, किशोर भोये, दशरथ दांगटे यांचे पाठबळ मिळाल्याने जल, जंगल अन धनतरी या गाण्याची निर्मिती करणे शक्य झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. आदिवासींचा सांस्कृतिक वारसा टिकवणे ही तरुणांची जबाबदारी असल्याचे मानून या शिक्षकांनी केलेला हा प्रयत्न तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे.विविध गाण्यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील विद्यार्र्थ्यांना शालेय अभ्यासक्रम अधिक सोप्या भाषेत कसा शिकवता येईल, असा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे.- सुनील लोखंडे, प्राथमिक शिक्षक, विक्रमगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर