शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पोलिसांचीही श्रद्धा अटळ

By admin | Updated: September 11, 2016 02:03 IST

‘सदरक्षणाय् खलनिग्रणाय’ हे बोधवाक्य प्रमाण मानून ड्यूटी फस्ट या उक्ती प्रमाणे जीवन व्यतित करणारे पोलीसांच्या आयुष्यामध्ये कुटुंबासह

विक्रमगड/तलवाडा : ‘सदरक्षणाय् खलनिग्रणाय’ हे बोधवाक्य प्रमाण मानून ड्यूटी फस्ट या उक्ती प्रमाणे जीवन व्यतित करणारे पोलीसांच्या आयुष्यामध्ये कुटुंबासह सण साजरा करण्याचे योग फारच कमी येतात. मात्र, त्यांच्यामुळेच समाजातील सर्वजण सुरक्षितपणे सण उत्सव साजारा करतात. हे जरी खरं असल तरी विक्रमगडच्या पोलीस लाईनमध्ये हा उत्सव दहा दिवस उत्साहाने साजरा होतो. हा बाप्पा पोलिसांचा गणराया म्हणून ओळखला जातो.एरव्ही सतत कामामुळे काहीशा मानसिक तणावाखाली वावरणारे पोलीस गणेश आगमन ते विसर्जनापर्यंत सर्व ताण तणाव विसरुन भक्तीमध्ये मग्न होउन लाडक्या गणरांची मनोभावे सेवा करतांना दिसतात. दुपार, सायंकाळच्या आरतीला सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली ड्युटी निभावून आवर्जुन उपस्थित राहतात. यादरम्यान भजन, कीर्तन, भंडारा अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलिसांच्या या गणरायाच्या दर्शनाला तालुक्यातील सर्व जाती धर्मातील नागरिक, भक्तगण येत असल्याने एकात्मतेचा संदेष देणारा अशीही या गणरायाची ख्याती गेली अनेक वर्षांपासूनची आहे.गणेशोत्सवावेळी पोलिसांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसते. पोलिसांच्या या गणरायाने अनेकांची इच्छापूर्ती केली आहे. त्यामुळे बदली होऊन आलेले अधिकारीही परंपरेनुसार चालत आलेली गणरायाची स्थापना करुन दहा दिवस भक्तीभावाने गणरायाची मनोभावे सेवा करीतात. (वार्ताहर)