शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

वाढवणची युवाशक्ती विचलित करण्याचा डाव. खासदारांच्या नावाने स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:22 IST

Vasai Virar News : जिल्ह्यात तरुण मुलांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेझ असून गावागावांत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेचे आमिष दाखवले जाते.

- हितेन नाईक पालघर -  वाढवण बंदराविरोधात तरुणवर्ग आक्रमक झाला असताना ‘युवाशक्ती’ कमजोर करण्यासाठी आणि त्यांचे वाढवणवरील चित्त विचलित करण्यासाठी चिंचणी येथील गावदेवी मंदिर मैदानावर खासदार चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सामन्यांमध्ये कुणीही सहभाग न घेण्याच्या आवाहनाला किनारपट्टीवरील तरुणांकडून प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात प्रशासन मोठी गर्दी होणाऱ्या स्पर्धांना परवानगी कशी देते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात तरुण मुलांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेझ असून गावागावांत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेचे आमिष दाखवले जाते. डहाणू तालुक्यातील सीआरडी ग्रुप आयोजित खासदार चषक, क्रिकेटचा महासंग्राम २०२० चे आयोजन २५ ते २७ डिसेंबरदरम्यान करण्यात आले असून प्रथम पारितोषिक २ लाख, द्वितीय १ लाख तर तृतीय ५० हजार रुपये. या पारितोषिकांसह मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथमच आयोजित या क्रिकेट सामन्याच्या जाहिरात फलकावर खासदार राजेंद्र गावित यांचे छायाचित्र आहे.दरम्यान, वाढवण बंदराविरोधात वाढवण आणि परिसरातील काही गावांनी सुरू केलेल्या आंदोलनाने आता व्यापक रूप घेतले आहे. डहाणू ते मुंबई-कुलाबापर्यंतच्या किनारपट्टीवरील गावागावांतून लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत. वाढवणसंदर्भात सर्वेक्षण अथवा कुठल्याही गोष्टीला या भागात स्थानिक ग्रामस्थ परवानगी देत नसून त्यांच्या कडव्या विरोधापुढे पोलीस बंदोबस्ताचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होणार नाही, यासाठी युवाशक्ती, महिला, लहान मुले ‘करो या मरो’च्या भूमिकेत केंद्र-राज्य शासनाच्या विरोधात उभी राहिली आहेत. त्यांची एकजूट आणि आक्रमकतेमुळे कुणाचीही डाळ शिजत नसल्याने या युवाशक्तीच्या एकजुटीची ताकद त्यांच्या आवडीच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून कमी करून त्यांचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न लाखोच्या बक्षिसांचे आमिष दाखवून करण्यात येत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून करण्यात येऊ लागला आहे. 

आमचा वाढवण बंदराला विरोध असल्याचे बॅनर आम्ही नव्याने बनवले आहेत. स्पर्धेसाठी मैदानाच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली आहे.- अमित मिश्रा, आयोजक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार