शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:32 IST

गावच्या वेशिवरून विविधरूपी सोंगे घेऊन नाचत वाजत गाजत मंदिरापर्यंत आणून पारंपरिक पद्धतीने पुजाºयामध्ये देवाची मनोभावे पूजा करून होणारी

निखील मेस्त्री नंडोरे: गावच्या वेशिवरून विविधरूपी सोंगे घेऊन नाचत वाजत गाजत मंदिरापर्यंत आणून पारंपरिक पद्धतीने पुजाºयामध्ये देवाची मनोभावे पूजा करून होणारी उत्सवाची सुरु वात म्हणजे पालघरमधील आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव. प्राचीन काळापासूनची आदिवासींची संस्कृती, रीती परंपरा व सामाजिक सलोखा जपत आलेला वाघोबा उत्सव यंदाही तितक्याच उत्साहाने साजरा करण्यात आला.तालुक्यातील पालघर मनोर रस्ता स्थित वाघोबा खिंड परिसरातील वाघोबा देवस्थानाचा वाघोबा उत्सव म्हणजे जिल्ह्यातील व परिसरातील लहानग्यांपासून थोरल्यापर्यंत आदिवासी बिगरआदिवासी बांधवांचा आनंदोत्सव होय. या दिवशी सर्व काही बाजूला सारत स्वत:च्या समाजाप्रती असलेली निष्ठा व एकत्र कुटुंबपद्धतीची परंपरा याचे जिवंत उदाहरण येथे पहावयास मिळते.पालघरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वाघोबा घाटात आजच्या आधुनिक युगातही आदिवासी संस्कृतीचा वारसा जपत आहे. परंपरा जपणारा समाज म्हणून आदिवासी समाज आजही सर्वश्रुत आहे. निसर्ग पूजणारा हा आदिवासी समाज व समाज बांधव या दिवशी एकत्र येत परिसरातील प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवाची मनोभावे पूजा-अर्चा करून हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घालतो.वाघोबा खिंड चढताना प्रथमदर्शनी समोर येते ते वाघोबा देवस्थान, याच देवस्थानाच्या मागील बाजूस डोंगराळ भागात मेघोबा व खिंडीकडे चढताना वनराईत असलेले भिलोबा देवस्थान आहे. येथे प्राचीन काळापासून पाऊस पडावा यासाठी मेघदेव म्हणजेच मेघोबाला पूजण्याची व जागर घालायची परंपरा खूप जुनी आहे. या उत्सवात येणाºया प्रत्येक भाविकास महाप्रसाद म्हणून भोजनात मांसाहारी जेवण देण्याची वेगळी प्रथा खुप काळापासून असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार