शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपाड्यावरील ख्रिश्चन धर्मप्रसार रोखण्याची आदिवासींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 03:48 IST

चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे.

डहाणू  - चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान संविधानाबद्दलची माहिती देणारे वादग्रस्त फलकाचा ठराव रद्द करणे हा अन्य विषय आहे. त्यामुळे सोमवारी होणारी ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली आहे.या ग्रामपंचायतीतील खाडीपाडा येथे एक ग्रामस्थ ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरिता येथील आदिवासिंवर जबरदस्ती करीत असून त्याकरिता प्रलोभनं देत असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तेथे या धर्माचे समाजमंदिर उभारले असून दर सोमवारी शेकडो लोकांचा जमाव एकवटतो. त्यामुळे आदिवासी आणि हिंदू धर्मियांच्या देवदेवतांची विटंबना होत असल्याचे अर्जात म्हटले आहे. तर शेवटच्या मुद्यात या ग्रामपंचायतीच्या १ मे २०१७ च्या ग्रामसभेतील ठराव क्र मांक ५/३ अन्वये भारतीय संविधान अन्वये अनुच्छेद १३(३) क नुसार दाखला देत, ख्रिश्चन धर्म प्रसारास बंदी घालण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.दरम्यान या फलकावर लिहलेले संविधानातील काही मुद्दे चुकीचे ठरल्याने हटविण्यात आले आहेत. त्याबाबतचा ठराव रद्द करणे हा विशेष ग्रामसभेचा अन्य मुद्दा आहे. तर धर्म प्रसाराविरोधात फलकावरील मुद्यांचा दाखला अर्जादारांनी दिला आहे.जिल्ह्याचे वेधले लक्षत्यामुळे संविधानाची योग्य माहिती व्हावी म्हणून पोलीस आणि ग्राम प्रशासनाला प्रबोधनाचे कार्य हाती घ्यावे लागणार आहे.याबाबत ग्रामसभेत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :palgharपालघर