शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज आजही उपेक्षित; शासन-प्रशासन निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:07 IST

धड रस्ते नाही की ॲम्ब्युलन्सची सोय नाही

हुसेन मेमनजव्हार : जव्हार व मोखाडा हे दोन्ही तालुके अतिदुर्गम भागातील आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात. या दोन्ही तालुक्यांना कुपोषण व भूकबळी या दोन समस्या सतत भेडसावत आहेत. मागील आठवड्यात या परिसरातील दोन महिलांना आपली नवजात बालके गमवावी लागली, तर एका महिलेचा मृत्यू झाला, दुसऱ्या महिलेला उपचार मिळाल्याने सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.या दोन घटनांनी प्रस्थापित व्यवस्थेची व लोकप्रतिनिधींची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. धड रस्ते नाहीत, ॲम्ब्युलन्स नाही, अशा स्थितीत त्या गरोदर महिलेला डोलीतून नेण्यात येत असताना तिची प्रसूती झाली, पण नवजात बालकाचा मात्र मृत्यू झाला. मोखाडा व जव्हार या दोन तालुक्यांत आजवर शेकडो बालके मृत्युमुखी पडली, पण शासन व प्रशासन यांच्या निष्क्रियतेमुळे आजही हा भाग पिछाडीवर आहे.

वर्षाकाठी शेकडो कोटी रु. खर्च केल्याचे दाखवण्यात येते, पण तो खर्च कोणाच्या घशात जातो, याचा आजवर शोध लागला नाही व पुढेही लागणार नाही. लोकप्रतिनिधी मात्र कुटुंबीयांची भेट घेणे, सांत्वन करणे व त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणे, तात्पुरती मदत देणे, इ. इव्हेंट करण्यामध्ये धन्यता मानत असतात.

या परिसरातील कुपोषण व भूकबळी संपुष्टात आणू शकेल, असा हक्काचा आपला माणूस गेल्या ७३ वर्षांत या दुर्गम भागातील आदिवासी समाजाला कधी सापडलेलाच नाही. मात्र, यंदा आमदार सुनील भुसारा यांच्या नावाने एक चांगला नेता जनतेने निवडून दिला असल्याचा प्रतिक्रिया जनसामान्यांतून मिळत आहेत. एक वर्षाच्या कार्यकाळात आमदार भुसारा यांनी या भागात काही प्रमाणात बदल घडविण्यात यश प्राप्त केले आहे.

निधी गेला कुठे?पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी शासनाने नव्याने निर्माण केलेल्या पालघर जिल्ह्याला आदिवासी दर्जा दिला. शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजजीवनात नव्याने उष:काल होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक निधी विपुल प्रमाणात मिळाला, पण त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झाला? नाही. उदंड योजना कार्यान्वित झाल्या. मोठ्या प्रमाणात निधीही खर्च झाला, पण तो कुठे झाला, त्याचा थांगपत्ता नाही.