पारोळ : पालघर, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतील पालघर, डहाणू, जव्हार, शहापूर, ठाणे, अलिबाग, रोहा अश्या सहा डिव्हजन मधून वृक्ष संवर्धन व वन्यजीव जनजागृती साठी फिरवण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन हरित चित्ररथाचे आगमन वसई पूर्व भागात झाले असून येथील शाळांतून व गावागावांतून हा रथ फिरवण्यात येत आहे. २६ जानेवारीपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.या रथामार्फत पर्यावरण विषयक उद्बोधक जनजागृती करण्यात येत आहे. येत्या तीन वर्षांच्या चार टप्प्यातील (पहिला टप्पा दोन कोटी, दुसरा तीन कोटी, तिसरा दहा कोटी व चौथा ३५ कोटी ) ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट भाताणे वनपरिक्षेत्र कर्मचारी सांगत आहेत. तसेच वृक्ष संवर्धन व लागवड यातून समस्त प्राणीमात्राला आवश्यक असणारे घटक मिळत असून पर्यावरणाचे संतुलनही राखले जाते. त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असा प्रचार करण्यात येत आहे. (वार्ताहर)
वृक्षसंवर्धन हरित चित्ररथ वसई भेटीला
By admin | Updated: February 13, 2017 04:45 IST